Beed Crime News Saam TV
महाराष्ट्र

Beed News: बेपत्ता अल्पवयीन मुलीला शोधण्यासाठी पोलिसांनी २५ हजार घेतले; नेकनूर पोलीस ठाण्यामधील धक्कादायक घटना

Beed Crime News: अशातच बेपत्ता अल्पवयीन मुलीचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी पॉकेट मनी म्हणून पीडित मुलीच्या वडिलांकडूनच २५ हजार रुपये घेतल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

विनोद जिरे

Beed Crime News: गेल्या काही दिवसांपासून राज्यात अल्पवयीन मुली आणि विवाहित महिला बेपत्ता होण्याचं प्रमाण वाढलं आहे. पोलिसांनी गायब झालेल्या मुलींचा शोध घ्यावा अशी मागणी नागरिकांकडून केली जातेय. अशातच बेपत्ता अल्पवयीन मुलीचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी पॉकेट मनी म्हणून पीडित मुलीच्या वडिलांकडूनच २५ हजार रुपये घेतल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.  (Breaking Marathi News)

बीडच्या (Beed News) नेकनुर पोलीस ठाण्यामध्ये हा प्रकार घडला आहे. यामुळे संताप व्यक्त केला जात असून पोलीस प्रशासनात थोडीफार माणुसकी उरली नाही का ? असा सवाल नागरिक विचारत आहे. यासंदर्भात पीडित पालकाने थेट पोलीस अधीक्षकांना पत्र लिहून घडलेला प्रकार कथन केला आहे.

नेकनूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत मागच्या काही काळात पोलिसांची मनमानी सुरु आहे. मुलगी हरवलेल्या पित्याकडून देखील पोलीस पैसे मागत असल्याची तक्रार सदर मुलीच्या पित्याने थेट पोलीस (Police) अधीक्षकांकडे केली आहे. दत्ता खराडे यांनी आपल्या मुलीचा शोध लावण्यासाठी नेकनूर पोलिसांनी २५ हजार रुपये घेतल्याचे म्हटले आहे.

तसेच त्यानंतर देखील तपस करण्यासाठी तुम्ही स्वतः चारचाकी गाडी घेऊन या, असे पोलीस सांगत असल्याचे या तक्रारीत म्हटले आहे. त्यामुळे नेकनूर पोलिसांनी माणुसकी विकली आहे का ? जर कुंपणचं शेत खाणार असेल, तर दाद मागायची कोणाकडे ? असा प्रश्न पीडित मुलीच्या वडिलांना पडला आहे.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Weightloss : १५ दिवस काहीच खाल्लं नाही तर इतकं होईल वजन कमी, वेळीच व्हा सावध नाहीतर...

Home Loan : दरवर्षी १ लाख एक्स्ट्रा भरल्याने होम लोन किती लवकर फेडता येईल? पाहा संपूर्ण कॅल्क्युलेशन

Maharashtra News Live Update: मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज चौदावा दिवस, प्रकृती खालावली

PM SVANidhi Scheme : फेरीवाल्यांसाठी मोठी बातमी! मोदी सरकार देणार कर्जासोबत ३० हजारांपर्यंत क्रेडिट कार्ड; जाणून घ्या नेमकी काय आहे योजना?

Liver health: लिव्हर कधीच होणार नाही खराब; डॉक्टरांनी सांगितलेले हे 2 ज्यूस सकाळी प्या, लगेच दिसेल फरक

SCROLL FOR NEXT