Beed Crime News Saam tv
महाराष्ट्र

Crime News: तरुणाचा निर्घृण खून; दोन दिवसांपासून होता बेपत्‍ता

तरुणाचा निर्घृण खून; दोन दिवसांपासून होता बेपत्‍ता

विनोद जिरे

बीड : बीडच्या अंबाजोगाई तालुक्यातील चीचखंडी शिवारात एका 22 वर्षीय तरुणाचा निर्घृण खून (Crime News) करण्यात आल्याची धक्कादायक घटना आज उघडकीस आली. अर्जुन पंढरी गडदे असे मृत तरुणाचे नाव आहे. (Maharashtra News)

अर्जुन दोन दिवसांपासून बेपत्ता होता. आज दुपारी चीचखंडी (Beed News) शिवारात रस्त्याच्या बाजूला त्याचा मृतदेह आढळून आला. अर्जुनच्या शरीरावरील घाव पाहता दगडाने चेहऱ्यावर, डोक्यात मारून आणि गळा आवळून त्याचा खून करण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी (Police) व्यक्त केला आहे.

कुटुंबाचा आक्रोश

अंबाजोगाई ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करुन मृतदेह शवविच्छेदनासाठी स्वाराती रुग्णालयात ठेवण्यात आला आहे. मुलाचा मृतदेह पाहून कुटुंबियांनी आक्रोश केला. मुलाचा खून नेमका कोणत्‍या कारणामुळे झाला, याचा शोध पोलिस करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monday Horoscope : 5 राशींना मिळणार खुशखबर! देवीच्या दर्शनाने दिवस शांततेत जाईल; वाचा सोमवारचे राशीभविष्य

Ratnagiri: काळीज पिळवटून टाकणारी घटना! खाडीत बुडून एकाच कुटुंबातील ४ मुलांचा मृत्यू

पुणे शिक्षक-पदवीधर निवडणुकीसाठी भाजपचा मास्टर प्लॅन; रवींद्र चव्हाण मैदानात!

YouTuber Dhruv Rathee: यूट्युबर ध्रुव राठींची 20 तासांनंतर सुटका; राठींचा पोलिसांवर गंभीर आरोप

Tukaram Mundhe: MPSCच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! आयुक्त तुकाराम मुंढेंवर सरकार सोपवणार नवी जबाबदारी

SCROLL FOR NEXT