Beed Crime News Saam TV
महाराष्ट्र

Beed Crime News : क्षुल्लक कारणावरून २ गटांमध्ये तुफान हाणामारी; दगड फेकून फोडली एकमेकांची डोकी

पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तब्बल ७० तरुणांना ताब्यात घेतले आहे.

साम टिव्ही ब्युरो

Beed News : बीडमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. येथे एका गावात दोन गटांमध्ये तुफान हाणामारी झाली आहे. प्रकरण पुढे चिघळल्यावर दोन्ही गटांकडून एकमेकांवर मोठ्या प्रमाणावर दगडफेक करण्यात आली. या घटनेत दोन्ही गटातील व्यक्तींना दुखापत झाली आहे. (Beed police)

मिळालेल्या अधिक माहितीनुसरा, बीडच्या केज शहरात क्षुल्लक कारणावरून दोन गटाने आमने-सामने येत तुफान दगडफेक केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. ही घटना रात्री ११.३० ते १२ च्या सुमारास घडली असून घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तब्बल ७० तरुणांना ताब्यात घेतले आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेत पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांच्यासह पूर्ण टीम घटनास्थळी दाखल झाली आहे.

सध्या केज शहरात तणावाचं वातावरण असून कोणताही अनुचित प्रकार घडूनये यासाठी पोलीस यंत्रणा सतर्क आहे. यामुळे शहरात तब्बल १५ अधिकाऱ्यांसह १५० पोलीस तैनात करण्यात आले आहेत.दरम्यान या प्रकरणी पोलिसांनी स्वतः फिर्यादी होत दोन्ही गटातील तब्बल ६५ जणांवर कलम १४३, १४७, १४८, १४९, १५३ (अ), ३२३, ३२४, २९५, ३३६, ३०८, ४२४, १०६, १८८ प्रमाणे गुन्हे दाखल केले आहेत.

कुणीही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करू नये अन्यथा कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा यावेळी पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी दिला आहे. या दोन्ही गटांमध्ये शुल्लक कारणावरून वाद झाल्याचं म्हटलं जात आहे. पोलीस या प्रकरणी अधिक चौकशी करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: नव्या सरकारचा शपथविधी हा वानखेडे स्टेडियमवर होणार

Eknath Shinde: शिंदेंची ताकद वाढली! अपक्ष आमदारासाठी थेट हेलिकॉप्टरच पाठवलं

Eknath Shinde Press Conference: साष्टांग दंडवत! शिंदे- फडणवीस- पवार लाडक्या मतदारांसमोर नतमस्तक; पाहा VIDEO

Amit Thackeray: मुंबईत राज ठाकरेंना धक्का, अमित ठाकरेंचा पराभव; उद्धव ठाकरेंच्या शिलेदाराने मैदान मारलं

Maharashtra Politcs : सहानभुती संपली, मविआ हारली; आघाडीच्या पराभवाची कारणे काय? वाचा स्पेशल रिपोर्ट

SCROLL FOR NEXT