Beed Crime News Saam Tv News
महाराष्ट्र

Beed: पिस्तूलाचा धाक अन् अत्याचार; बीडच्या पोलिसानं विवाहित महिलेला शिविगाळ करत दिली जीवे मारण्याची धमकी

Beed Crime News: बीडमध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षकाने विवाहित महिलेला पिस्तुलाचा धाक दाखवत अत्याचार केल्याचा प्रकार. शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल, आरोपीविरोधात गुन्हा नोंद.

Bhagyashree Kamble

बीडमध्ये दिवसेंदिवस गुन्हेगारी घटनांमध्ये वाढ होत असल्याचं चित्र आहे. अशातच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका विवाहित महिलेवर पिस्तुलाचा धाक दाखवत अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. यानंतर संबंधित पोलीस अधिकाऱ्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सहाय्यक पोलीस निरीक्षक रविंद्र शिंदे असे आरोपीचे नाव आहे. ते बीडमध्ये कार्यरत होते. त्यानंतर त्यांची धाराशिवमध्ये बदली करण्यात आली. बीडमध्ये कार्यरत असताना पोलिसाची पीडित विवाहित महिलेशी ओळख झाली. नंतर दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले. वारंवार गाठीभेटी होत असायच्या.

यानंतर आरोपीने महिलेला पिस्तूलचा धाक दाखवत स्वतः सोबत राहण्यास भाग पाडले. यादरम्यान, आरोपीची बदली धाराशिव जिल्ह्यात झाली. यानंतर देखील त्यानं पिस्तूलाचा धाक दाखवत पीडितेसोबत अत्याचार केला. तसेच शिविगाळ करत जीवे मारण्याचीही धमकी दिली. पीडितेनं आरोपीसोबत धाराशिवमध्ये राहण्यास नकार दिल्यामुळे त्यानं विवाहितेला धमकी दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

India Fort : किल्ल्यातच वसलंय अर्ध शहर, जगातील 'हे' अनोखं ऐतिहासिक ठिकाण पाहिलंय का?

Maharashtra News Live Update: नागपूरमध्ये ट्रॅक्टर पुलावरून नदीत कोसळला, एकाचा जागीच मृत्यू

Online Rent Agreement : घरमालक आणि भाडेकरूंनी ऑनलाइन भाडेकरार कसा करावा? जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

Farmer Loan Waiver Scheme: मयत शेतकऱ्यांच्या वारसांनाही कर्जमुक्तीचा लाभ मिळणार, सरकारचा मोठा निर्णय

पांढरे कपडे पुन्हा नव्यासारखे चमकवा! पिवळे डाग घालवण्यासाठी ‘या’ ५ स्मार्ट ट्रिक्स वापरा

SCROLL FOR NEXT