Beed Crime Saam TV
महाराष्ट्र

Beed Crime: शेतकऱ्याला रस्त्यात अडवून ५१ लाखांची रोकड लंपास; वडवणी पोलिसांकडून तपास सुरु

Beed News: शामसुंदर लांडे असं शेतकऱ्याचं नाव आहे. शामसुंदर यांनी केज येथील जिनींगवर कापूस विकला होता. त्याचे आलेले ५१ लाख रुपये घेवून ते वडवणीकडे येत होते. यावेळी त्यांना दुचाकीवरुन आलेल्या दोघांनी अडवले.

साम टिव्ही ब्युरो

Beed Crime News:

बीडमध्ये चोरट्यांनी शेतकऱ्याला लूटल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शेतकऱ्याने कापूस विक्री केल्यानंतर यातून त्याला ५१ लाख रुपये मिळाले होते. पैसे घेवून येत असलेल्या व्यापार्‍याला चोरट्यांनी रस्त्यातच आडवले आणि त्याच्याजवळील सर्व रक्कम लूटली.

बीडच्या वडवणी शहरालगत ही धक्कादायक घटना घडली आहे. शामसुंदर लांडे असं शेतकऱ्याचं नाव आहे. शामसुंदर यांनी केज येथील जिनींगवर कापूस विकला होता. त्याचे आलेले ५१ लाख रुपये घेवून ते वडवणीकडे येत होते. यावेळी त्यांना दुचाकीवरुन आलेल्या दोघांनी अडवले.

नेमकी त्याच वेळी एक चारचाकी गाडीही तेथे आली. त्यातून आणखी तिघेजण खाली उतरले. या सर्वांनी मिळून लांडे यांना काठीने मारहाण करत त्यांच्याकडील पैशाची बॅग घेवून पोबारा केला.

दरम्यान यानंतर लांडे यांनी तात्काळ वडवणी पोलीस ठाणे गाठत फिर्याद दिलीय. या प्रकरणी वडवणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून चोरट्यांना पकडण्यासाठी पोलिसांची दोन पथके रवाना झाली आहेत.

मंदिरात चोरी करणाऱ्या अट्टल चोरट्यास अटक

वर्धा जिल्ह्याच्या देखील चोरीची एक मोठी घटना उघडकीस आली आहे. तळेगाव येथील श्रीकृष्ण मंदिरात चोरी करून ४० हजार रुपयांची रक्कम चोरून नेणाऱ्या अट्टल चोरट्याच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत.

रोशन उर्फ बबन रमेश वरघट (रा. मरामाय नगर, काटोल, जि. नागपूर) असे आरोपीचे नाव असून त्याच्याकडून महागड्या कारसह १,९६५ रुपये रोख आणि मोबाइल हस्तगत करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gadchiroli Bus Accident: अचानक नियंत्रण सुटलं अन् ST बस उलटली; शिवणी नदी पुलावर मोठा अपघात

Brain Facts : दुसऱ्याला जांभई देताना पाहिल्यावर आपल्यालाही जांभई का येते? 'ही' ६ कारणे वाचा

Pune : भव्य दरवाजे अन् मजबूत दगडी तट; पुण्यात लपलंय एक ऐतिहासिक ठिकाण, लोकेशन आताच नोट करा

3 वेळा आमदार राहिलेल्या दिग्गज नेत्याचे निधन; राजकारणात शोककळा

Maharashtra News Live Update: पुणे फेस्टिवलचे आज उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांच्याहस्ते उद्घाटन

SCROLL FOR NEXT