Beed Crime News 17-year-old girl Physical abuse by young men by blackmail shocking incident Saam TV
महाराष्ट्र

Beed News: संतापजनक! १७ वर्षीय मुलीचा आंघोळ करतानाचा व्हिडीओ काढला अन्... बीडला हादरवून टाकणारी घटना

Beed Crime News: १७ वर्षीय मुलीचा आंघोळ करतानाचा व्हिडीओ एका तरुणाने मोबाइलमध्ये रेकॉर्ड केला.

विनोद जिरे

Beed Latest Crime News

बीड शहरातून एक संतापजनक घटना समोर आली आहे. एका तरुणाने १७ वर्षीय अल्पवयीन तरुणीचा आंघोळ करतानाचा व्हिडिओ काढून दुसऱ्या तरुणाला पाठवला. या तरुणाने तिला ब्लॅकमेलिंग करण्यास सुरुवात केली. या ब्लॅकमेलिंगला कंटाळून तरुणी दुसऱ्या तरुणाकडे मदत मागायला गेली. मात्र, या तरुणाने तिची मदत न करता तिच्यावर अत्याचार केला. (Latest Marathi News)

ही धक्कादायक आणि संतापजनक घटना बीड शहरातील (Beed News) शिवाजी नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलीय. या प्रकरणी रात्री उशिरा तिघाविरुद्ध शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. अनिल सोमनाथ लांडे (रा. घाटसावळी, ता. बीड) असे अत्याचार करणाऱ्या नराधम आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी त्याला अटक केली आहे. तर इतर दोन आरोपी अद्यापही फरार आहे, पोलिसांकडून त्यांचा शोध घेतला जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एका १७ वर्षीय मुलीचा आंघोळ करतानाचा व्हिडीओ एका तरुणाने मोबाइलमध्ये रेकॉर्ड (Crime News) केला. त्या तरुणाने हा व्हिडीओ त्याच्या मित्रास शेअर केला.

त्याने पीडित मुलीस ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. त्यामुळे ती घाबरून गेली. या संकटातून सुटका व्हावी या उद्देशाने ती मदतीसाठी अनिल लांडे याच्याकडे गेली असता तिला रूममध्ये नेऊन अनिलने तिच्यावर अत्याचार केला. हा प्रकार काही नागरिकांना लक्षात आल्यानंतर त्यांनी याची माहिती शिवाजी नगर पोलिसांना दिली.

त्यानंतर पीडितेच्या तक्रारीवरून तिघांवर पोक्सो अॅक्ट, बलात्कार व माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा दाखल झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून बीडमध्ये गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. गुन्हेगारांना पोलिसांचा तसेच कायद्याचा धाकच उरला नाहीये का? असा प्रश्न या घटनेनं उपस्थित होतोय.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मुंबई पोलिसांवर जीवघेणा हल्ला; तलवार, हॉकी, फायटर पंचने मारहाण, परिसरात खळबळ

Maharashtra Live News Update: अमरावतीच्या एमआयडीसी परिसरात फॅक्टरीला भीषण आग

Ajit Pawar Plane Crash: विमानातून उडी मारण्याची धरपड कुणीतरी करत होतं पण....; अपघाताप्रकरणी नवी माहिती आली समोर

Earthquake : भूकंपाने हाहाकार, जमीन थरथरली; लोक घरातून बाहेर पळाले

Chandrapur Politics: वडेट्टीवार आणि धानोरकर वाद शिगेला,18 नगरसेवक दिल्लीला; महापौरपदाबाबत अंतिम निर्णय घेणार राहुल गांधी?

SCROLL FOR NEXT