Beed Crime Saam Tv
महाराष्ट्र

Beed Crime: बीड हादरले! परळीत राष्ट्रवादीच्या नेत्यावर प्राणघातक हल्ला, ५ ते ६ जणांनी भररस्त्यात कोयत्याने केले सपासप वार

Beed Ncp Leader Assaulted: बीडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या नेत्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला. ५ ते ६ जणांनी त्यांच्यावर कोयत्याने सपासप वार केले. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झालेत.

Priya More

Summary -

  • बीडच्या परळीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या नेत्यावर प्राणघातक हल्ला

  • संजय जाधव यांच्यावर कोयत्याने सपासप वार

  • या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या नेत्यावर रुग्णालयात उपचार सुरू

  • ५ ते ६ अज्ञात हल्लेखोरांनी हल्ला केल्याची माहिती

योगेश काशिद, बीड

NCP Leader Sanjay Jadhav: बीडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या नेत्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. परळीतील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती संजय जाधव यांच्यावर हा हल्ला करण्यात आला. त्यांच्यावर कोयत्याने सपासप वार करण्यात आले. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे बीड हादरले आहे. पोलिस सध्या या घटनेचा तपास करत आहेत.

बीड जिल्ह्यातील परळी विधानसभा मतदारसंघात गुन्हेगारांचे धाडस प्रचंड वाढले असून आता राजकीय नेत्यांवरही भररस्त्यात प्राणघातक हल्ले होऊ लागले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती संजय जाधव यांच्यावर रविवारी रात्री उशिरा ५ ते ६ अज्ञात हल्लेखोरांनी कोयत्याने सपासप वार करून जीवघेणा हल्ला केला. या भीषण हल्ल्यात संजय जाधव हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

रात्री साडेअकरा वाजताच्या सुमारास संजय जाधव हे गोवर्धन हिवरा ते सिरसाळा रोडवर असलेल्या आपल्या शेताकडून घराकडे जात होते. ते गोवर्धन शिवारात आले असता दबा धरून बसलेल्या ५ ते ६ अज्ञात हल्लेखोरांनी त्यांना अडवून अचानक त्यांच्यावर हल्ला केला. हल्लेखोरांनी कोयत्यासारख्या धारदार शस्त्राने जाधव यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले. त्याच्या डोक्यावर आणि शरीरावर अनेक वार करण्यात आले. रक्तबंबाळ अवस्थेत त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

बाजार समितीच्या माजी पदाधिकाऱ्यावर असा हल्ला झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या हल्ल्यामागे नेमके कारण काय असावे? याबाबत परिसरात विविध चर्चांना उधाण आले आहे. काही दिवसांपूर्वीच संजय जाधव यांनी गावातील एका तरुणाला मारहाण केल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. या पार्श्वभूमीवर, हा हल्ला त्याच वादातून झाला असावा का? असा संशय व्यक्त केला जात आहे. तो व्हायरल व्हिडिओ आणि आता झालेला हा प्राणघातक हल्ला या दोन्ही गोष्टींची सध्या जिल्ह्यात मोठी चर्चा सुरू आहे. परळी पोलिस या हल्ल्याचा तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

लग्नासाठी १४ कोटींचा पॅलेस बुक; होणाऱ्या पत्नीच्या वाढदिवशी ट्रेकिंगला गेलेल्या बिल्डरच्या मुलाचा मृत्यू, लोहगडावर नेमकं काय झालं?

PM Kisan Yojana : शेतकऱ्याच्या खात्यावर किती वाजता जमा होणार ₹२०००? पीएम किसान योजनेची महत्त्वाची अपडेट आली समोर

पुण्यात रक्तरंजित थरार; नराधमाने 'लिव्ह-इन पार्टनर'च्या ३ वर्षीय मुलाला क्रूरपणे संपवलं, धक्कादायक कारण समोर

Haunted Fort : भारतातील ५ सर्वात भयानक अन् रहस्यमय किल्ले, सूर्यास्तानंतर येथे जाण्याची कोणी हिंमतच करत नाही

Director-Actress : अभिनेत्रीला जवळ ओढलं, कमरेत हात टाकला अन्...; प्रसिद्ध दिग्दर्शकानं मर्यादा ओलांडल्या, VIDEO तुफान व्हायरल

SCROLL FOR NEXT