Beed Crime News Saam tv
महाराष्ट्र

Beed Crime: पतीसोबत वाद करुन माहेरी निघाली, पण नराधमाने रस्त्यातच गाठले; संतापजनक घटनेने बीडमध्ये खळबळ

Beed Crime News Update: या प्रकरणी बीड (Beed Police) ग्रामीण पोलीसांनी नराधम आरोपीला अटक केली आहे..

विनोद जिरे

Beed News: पतीसोबत वाद करुन माहेरी चाललेल्या ३० वर्षीय महिलेवर अत्याचार केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. बीड जिल्ह्यात घडलेल्या या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे. या प्रकरणी बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीस पोलीसांनी अटक केली आहे. (Beed News Update)

याबाबत समोर आलेल्या माहितीनुसार, पिडीत महिलेचा किरकोळ कारणावरुन आपल्या पतीसोबत वाद झाला होता. त्यामुळे रागाच्या भरात माहेरी जायला निघाल्या. माहेरी जात असताना विवाहितेला एका तरुणाने रस्त्यात अडवले. यावेळी त्याने तुम्हाला गावी सोडतो म्हणून दुचाकीवर बसवले. (Latest Marathi News)

त्यानंतर रस्त्यातच तिच्यावर अत्याचार केला. या प्रकरणी बीड (Beed Police) ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीस पोलीसांनी अटक केली आहे. (Beed News Update)

विशाल रविंद्र कदम (वय 22) असे या आरोपीचे नाव असून तो बीड तालुक्यातील शाहबाजपूर येथील रहिवासी असल्याचे समोर आले आहे. या संतापजनक घटनेने बीड तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. नराधमाला कठोर शिक्षा करण्याची मागणी होताना दिसत आहे. पोलिस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत. (Crime News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hair Care: कोंडा होईल कायमचा दूर केस होतील सिल्की, केसांवर आठवड्यातून एकदा लावा किचनमधील हा पदार्थ

आणखी एक पक्ष फुटणार? बैठकीला ६० आमदारांची दांडी; पक्षप्रमुखांनी घेतला मोठा निर्णय

पार्लरला जायची अजिबात गरज नाही! मऊ आणि मुलायम केसांसाठी घरीच करा 'दही हेअरस्पा'; पहिल्याच वॉशमध्ये दिसेल फरक!

Maharashtra News Live Update: भोंदू अशोक खरातचा ताबा पुन्हा सिन्नर पोलिसांकडे

सर्वात मोठी बातमी! दोन्ही शिवसेना एकत्र येणार? उद्धव ठाकरेंच्या विश्वासू नेत्याचं मोठं विधान; राजकीय वर्तुळात खळबळ|VIDEO

SCROLL FOR NEXT