Beed Police Station Saam Tv
महाराष्ट्र

Beed Crime: गँग्स ऑफ परळी! ३ दिवसाला एक मृतदेह, बीडमधील भयानक वास्तव समोर

109 Dead Bodies Beed Discovery: बीडमध्ये गुन्हेगारीच्या घटना किती वाढत चालल्या आहेत याचे वास्तव पुन्हा समोर आले आहे. ३ दिवसाला एक मृतदेह सापडत आहेत. बीडमध्ये वर्षभरात १०९ मृतदेह आढळले असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

Priya More

विनोद जिरे, बीड

सरपंच संतोष देशमुख हत्याकांडामुळे बीड जिल्हा चांगलाच चर्चेत आले. या हत्याकांड प्रकरणावरून राज्याचे मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर अनेक आरोप केले जात आहे. अशातच आता धनंजय मुंडे यांच्या परळीमधून धक्कादायक बातमी समोर आली आहे. बीडच्या परळी शहरासह तालुक्यात गुन्हेगारीच्या घटना खूप वाढल्या आहेत.

परळी तालुक्यामध्ये मागच्या वर्षभरामध्ये तब्बल १०९ जणांचे मृतदेह आढळले आहेत. ही आकडेवारी समोर येताच आता बीड पोलिसांच्या आणि या जिल्ह्याचे मंत्री असलेल्या धनंजय मुंडे यांच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

गेल्या वर्षभरात परळी तालुक्यातील ३ पोलिस ठाण्याच्या हद्दीत तब्बल १०९ मृतदेह शहर आणि परिसरात आढळून आले आहेत. प्राथमिक माहितीवरून ही धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. तर परळी हे रेल्वे स्थानकाचे शेवटचे स्थानक असल्याने प्रवाशांची संख्या मोठी आहे. यामुळे देखील या संख्येत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

परळी ग्रामीण पोलिस ठाण्याच्या हद्दीत एकूण ६६ मृतदेह आढळून आले आहेत. त्यापैकी ६४ मृतदेहाची ओळख पटली आहे. तर २ मृतदेहाची ओळख पटली नाही. त्याचप्रमाणे परळी शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीमध्ये एकूण १७ मृतदेह आढळले असून सर्वांची ओळख पटली आहे.

तर परळी संभाजीनगर पोलिस ठाणे हद्दीत २६ मृतदेह आढळले आहेत. त्यातील २१ मृतदेहाची ओळख पटवण्यात आलीय. तर ४ मृतदेहाची ओळख पटली नाही. तिन्ही पोलीस ठाण्याच्या हद्दीत मागील वर्षभरात १०९ मृतदेह शहर आणि परिसरात आढळून आले आहेत. दरम्यान दर ३ दिवसांनी १ अशी मृतदेह सापडल्याची सरासरी आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shahapur : अतिवृष्टीमुळे शेतातील बेडाघर कोसळले; झोपलेल्या शेतकऱ्याचा दबून मृत्यू

Shivneri To Vasai Fort: शिवनेरी किल्ल्यापासून वसई किल्ल्यापर्यंत कसे पोहोचाल? जाणून घ्या सर्व पर्याय

Maharashtra Live News Update: उद्धव ठाकरे यांच्या जन्मदिनानिमित्त सोलापुरात पार पडलं महाआरोग्य शिबीर

Latur Tourism : पावसाळ्यात हिरवळ, धबधबा आणि शांतता हवीय? मग सहस्त्रकुंड नक्की पाहा

MNS- Shivsena: झाली युती झाली...; राज- उद्धव ठाकरे भेटीनंतर भास्कर जाधवांचं मोठं विधान, पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT