Shivsangram Party News Saamtv
महाराष्ट्र

Beed News: 'शिवसंग्राम' संघटनेत मोठी फूट, दिवंगत विनायक मेटेंचे मोठे भाऊ पक्षातून बाहेर; नव्या संघटनेची घोषणा

Shivsangram Party News: दिवंगत नेते विनायक मेटे यांचे भाऊ रामहरी मेटे यांनी 'शिवसंग्राम पक्षातून' बाहेर पडण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. आज रामहरी मेटे हे रायगडावर आपल्या जय शिवसंग्राम या नवीन संघटनेची घोषणा करणार आहेत.

विनोद जिरे

Beed Political News:

बीडच्या राजकारणातून एक सर्वात मोठी ब्रेकिंग समोर येत आहे. दिवंगत नेते विनायक मेटे यांचे भाऊ रामहरी मेटे यांनी 'शिवसंग्राम' पक्षातून बाहेर पडण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. आज रामहरी मेटे हे रायगडावर आपल्या जय शिवसंग्राम या नवीन संघटनेची घोषणा करणार आहेत. (Maharashtra Politics)

विनायक मेटेंचे बंधु शिवसंग्रामधून बाहेर...

याबाबत सविस्तर माहिती अशी की, महायुतीचा घटक पक्ष असलेल्या 'शिवसंग्राम' पक्षात (Shivsangram Party) मोठी फूट पडली आहे. दिवंगत विनायक मेटे यांचे भाऊ रामहरी मेटे यांनी मेटे यांनी स्थापन केलेल्या शिवसंग्राम संघटनेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. आज रामहरी मेटे रायगडावर आपल्या नवीन संघटनेची घोषणा करणार आहेत.

जय शिवसंग्राम पक्षाची घोषणा

यापुढे 'जय शिवसंग्राम' (Jay Shivsangram) या पक्षाच्या माध्यमातून सक्रिय होणार असल्याचे रामहरी मेटे यांनी स्पष्ट केले आहे. दिवंगत विनायक मेटे (Vinayak Mete) यांच्या निधनानंतर रामहरी मेटे अलिप्त होते. मात्र आता शिवसेना आणि राष्ट्रवादी पाठोपाठ मेटे यांनी स्थापन केलेल्या शिवसंग्राम संघटनेत देखील फूट पडल्याचं दिसून येत आहे.

दरम्यान, रामहरी मेटे (Ramhari Mete) हे विनायक मेटे यांचे छोटे बंधू आहेत. ते हयात असेपर्यंत रामहरी मेटे यांनी त्यांच्या सोबत राहून शिवसंग्रामचे काम पाहिले होते. मात्र आता शिवसंग्राम संघटनेतून काही कारणास्तव त्यांनी बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. (Latest Marathi News)

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: कोथरुडमधील 'निर्वाण बिहार' सोसायटीत गुंडाचा हैदोस

Black Panther: सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात पहिल्यांदाच दिसला ब्लॅक पँथर; पाहण्यासाठी पर्यटकांची उत्सुकता वाढली| VIDEO

Trendy Mangalsutra Designs: ऑफिसमध्ये फॉर्मल ड्रेसवर ट्राय करा हे ७ ट्रेंडी लेटेस्ट नाजूक मंगळसूत्र डिझाइन्स

Vidhan Parishad Election 2026: विधानपरिषद निवडणुकीसाठी राष्ट्रवादी कुणाला देणार संधी, 'या' ६ नेत्यांची नावं चर्चेत

Happy Birthday Sachin: १०० कोटींचा बंगला, ३५ कोटींच्या गाड्या, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरची एकूण संपत्ती किती?

SCROLL FOR NEXT