Manoj Jarange Patil VS Chhagan Bhujbal  Saam TV
महाराष्ट्र

Manoj jarange Patil: माझी ओबीसी बांधवांना विनंती, तुम्ही सर्वांनी फोन करा अन्... मनोज जरांगेंचा पुन्हा भुजबळांवर निशाणा; नेमकं काय म्हणाले?

Manoj jarange Patil On Chhagan Bhujbal: मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील आज बीड, श्रीगोंदा भागाचा दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात मनोज जरांगे पाटील यांनी विविध कार्यक्रमांना हजेरी लावली. यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांच्यावर निशाणा साधला.

विनोद जिरे

Beed News:

मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील आज बीड, श्रीगोंदा भागाचा दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात मनोज जरांगे पाटील यांनी विविध कार्यक्रमांना हजेरी लावली. तसेच बीडच्या मांजरसुंबा गावात सुरू केलेल्या जिमचे उदघाटन केले. तत्पुर्वी बीडच्या मोरदरा येथे जरांगे पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांच्यावर निशाणा साधला.

काय म्हणाले जरांगे पाटील?

"तो ज्या पक्षात जातो, तो पक्ष मोडतो. त्याला काय कळतय. आम्ही काय म्हणतो लक्षात ठेवा, तुम्ही तीन वेळेस आमचे आरक्षण घालवले. आता पुन्हा पुन्हा त्या वाटेवर तुम्ही येऊ नका. आम्हाला गोरगरीब ओबीसी बांधवांचं वाटोळ करायचं नाही, त्याने सुद्धा कुठेतरी गोरगरीब मराठा बांधवांशी थोडं थांबलं पाहिजे," अशा शब्दात मनोज जरांगे पाटील यांनी छगन भुजबळांवर (Chhagan Bhujbal) टीका केली.

आपण मंत्री आहोत, याची जाणीव असावी...

तसेच "एवढे विषारी विचार नसले पाहिजेत. आपण मंत्री आहोत याची जाणीव असली पाहिजे. जर तो तसंच करायला लागला तर आम्हाला नाईलाज आहे, आम्हाला ते करावंच लागेल. माझी ओबीसी बांधवांना विनंती आहे, तुम्ही सर्वांनी त्याला फोन करा आणि थांब म्हणावं, मला वाटतं त्याच्या आडनावचं वाटोळ करणारा पाहिजे होतं," असेही मनोज जरांगे पाटील (Manoj jarange Patil) यावेळी म्हणाले.

. (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

उद्यापासून पुन्हा उपोषण...

सग्या सोयऱ्यांच्या कायद्याबाबत सरकारची स्पष्ट भूमिका नसल्याने उद्यापासून आपण आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला दिला आहे. सरकारकडून होणारा दगा फटका समाजाला परवडणार नाही म्हणून आपण आमरण उपोषण करतोय असंही जरांगे यांनी स्पष्ट केले. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dates Benefits: खजूर खाण्याचे हे ७ फायदे माहितीयेत का?

Mumbai Shocking : मुंबई हादरली ! १५ वर्षीय मुलीवर जन्मदात्या वडिलांकडून बलात्कार, आईचाही समावेश

Shravana 2025: श्रावणात शिवलिंग पूजा करताना 'या' ७ वस्तू टाळा, होऊ शकतो अपशकुन

Liver cirrhosis last stage: लिव्हर सिरोसिसच्या लास्ट स्टेजमध्ये शरीरात होतात 'हे' मोठे बदल; यकृत सडण्याची लक्षणं वेळीच ओळखा

HBD Ranveer Singh : रणवीर सिंहचं ५ सुपरहिट चित्रपट, पहिला सिनेमा कोणता?

SCROLL FOR NEXT