Beed Bus Accident: धुळे- सोलापूर महामार्गावर एसटी बसचा भीषण अपघात, १५ प्रवाशी जखमी; दोघांची प्रकृती गंभीर Saamtv
महाराष्ट्र

Beed Bus Accident: धुळे- सोलापूर महामार्गावर एसटी बसचा भीषण अपघात, १५ प्रवासी जखमी; दोघांची प्रकृती गंभीर

Dhule- Solapur Highway Accident: सर्वांवर बीडच्या शासकीय रूग्णालयात उपचारात सुरू असून जखमींपैकी २ जणांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे.

विनोद जिरे

Beed Accident News: बीडमधून (Beed Accident) एक भीषण अपघाताची बातमी समोर आली आहे. बीडमध्ये एसटी बस आणि मिनी बसमध्ये अपघात झाला. यामध्ये 15 प्रवासी जखमी झाले असून जखमींमधील दोघांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. (Accident News)

याबाबत समोर आलेल्या माहितीनुसार, बीडमधील धुळे - सोलापूर (Dhule- Solapur Highway) या राष्ट्रीय महामार्गावरील वाणगाव फाट्याजवळ भीषण बस अपघाताची घटना घडली. राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी बस आणि खासगी मिनी बसमध्ये हा भीषण अपघात झाला.

अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी धाव घेत जखमींना मदत केली. अपघातात 15 प्रवासी जखमी झाले आहेत. या सर्वांवर बीडच्या शासकीय रूग्णालयात उपचारात सुरू असून जखमींपैकी २ जणांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. अपघात इतका भीषण होता की दोन्ही बसचे मोठे नुकसान झाले आहे.

दरम्यान, आज सकाळी बुलढाण्यामध्ये (Buldhana) भीषण बस अपघाताची घटना घडली होती. मलकापूर शहरातील हायवे क्रमांक सहा वरती दोन खासगी ट्रॅव्हल्सची समोरासमोर धडक झाली. या दुर्घटनेत ७ प्रवाशांचा मृत्यू झाला तर २५ ते ३० प्रवासी जखमी झाले आहेत. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

T20 World Cup : दक्षिण आफ्रिकाविरुद्धचा पराभव भोवणार, तिघांपैकी कुणाची विकेट पडणार? टीम इंडियात मोठा उलटफेर होणार

Shevgyachya Shenganchi Bhaji Recipe : भाकरी अन् झणझणीत शेवग्याच्या शेंगांची भाजी, एक घास खातच येईल गावाची आठवण

Maharashtra Live News Update: पुण्यात पाण्याच्या शोधात असणारा बिबट्या विहिरीत पडला

Seviyan Kheer Recipe: सणासुदीला घरी आलेल्या पाहुण्यासाठी झटरपट बनवा स्वादिष्ट शेवयाची खीर, वाचा सोपी रेसिपी

संतापजनक! बाथरूमच्या फलकावर लावला छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो

SCROLL FOR NEXT