Beed Breaking : मृत्यूने कवटाळले मात्र, लेकीचा आईच्या हातातील हात सुटला नाही! विनोद जिरे
महाराष्ट्र

Beed Breaking : मृत्यूने कवटाळले मात्र, लेकीचा आईच्या हातातील हात सुटला नाही!

बीडच्या बानेगाव येथे गौरी गणपतीच्या सणाला माहेरी आलेल्या शिक्षिकेचा मृतदेह, तिच्या दीड वर्षांच्या चिमुकलीसह विहिरीत आढळून आला. मृतदेह बाहेर काढताना विहिरीतील पाणी उपसल्यानंतर, आईच्या कडेवर लेक अन् लेकीचा आईच्या हातात हात होता.

विनोद जिरे

बीड : मृत्यूने कवटाळले मात्र आईच्या कडेवर लेक अन् लेकीचा आईच्या हातातील हात सुटला नाही. बीडच्या बानेगाव येथे गौरी गणपतीच्या सणाला माहेरी आलेल्या शिक्षिकेचा मृतदेह, तिच्या दीड वर्षांच्या चिमुकलीसह विहिरीत आढळून आला. मृतदेह बाहेर काढताना विहिरीतील पाणी उपसल्यानंतर, आईच्या कडेवर लेक अन् लेकीचा आईच्या हातात हात होता. हे दृष्य पाहून उपस्थितांच्या डोळ्यात पाणी आले. आशा सुंदर जाधवर वय 22 व शांभवी सुंदर जाधवर वय दीड वर्ष अशी या माय-लेकीची नावे आहेत. अगोदरच आशा या पतीचे काेरोनामुळे निधन झाल्याने विरहात होत्या. त्यात माहेरी आल्यानंतर ही दुर्दैवी घटना घडल्याने माय-लेकीच्या मृत्यूचे रहस्य कायम आहे.

हे देखील पहा :

आशा यांचे केज तालुक्यातील बाणेगाव हे माहेर असून त्यांचा विवाह उस्मानाबाद जिल्ह्यातील वडजी येथील सुंदर जाधवर यांच्याशी 3 वर्षांपूर्वी झाला होता. आशा व सुंदर हे दोघेही शिक्षक होते. ते पुण्यात राहत असताना वर्षभरापूर्वी सुंदर यांचे कोरोनाने निधन झाले होते. पतीच्या जाण्याने आशा सैरभर झाल्या होत्या. गणपतीच्या सणाला त्या मुलगी शांभवीसह माहेरी बाणेगावला आल्या होत्या. मात्र, काल वडील बाहेरगावी गेले होते तर आई शेतीकामात व्यस्त होती. दुपारी 4 वाजता मुलगी शांभवीला कडेवर घेऊन आशा शेतात गेल्या. यावेळी खेळता-खेळता मुलगी विहिरीजवळ गेली.

तिचा तोल गेल्याने धावत जाऊन आशा यांनी तिला वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र दोघींचाही बुडुून मृत्यू झाल्याचं गावकऱ्यांनी सांगितलं. आशा व शांभवी या मायलेकी गायब झाल्याने शोधाशोध सुरु झाली. सायंकाळी सहा वाजता विहिरीच्या काठावर आशा यांची चप्पल आढळली. त्यामुळे त्या दोघी विहिरीत पडल्याची शक्यता गृहित धरुन तरुणांनी विहिरीत उड्या घेतल्या. मात्र, विहीर पाण्याने तुडूंब भरलेली असल्याने पाच विद्युत पंपांद्वारे पाणी उपसा सुरु झाला. रात्री साडेअकरा वाजता पाणी उपसा केल्यावर माय-लेकीचे मृतदेह आढळून आले.

रात्री उशिरा मायलेकीचे मृतदेह नांदूरघाट ग्रामीण रुग्णालयात पाठविले होते. तर, आज सकाळी त्यांचे शवविच्छेदन करण्यात आले. त्यानंतर मायलेकीवर एकाच चितेवर अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान, या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Edited By : Krushnarav Sathe

हेही वाचा :

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fry Pineapple Recipe: आंबट-गोड अननस फ्राय कसं बनवायचं? बघताच क्षणी तोंडाला येईल पाणी

Maharashtra Live News Update: धाराशिवमध्ये माजी मंत्री तानाजी सावंत यांना मोठा झटका, घरातून बंडखोरी

Puri Recipe: Oil Free पुऱ्या खा, 'ही' रेसिपी लगेचच करा नोट

Kisanrao Hundiwale Case: किसनराव हूंडीवाले हत्या प्रकरणात मोठी अपडेट, भाजप नेत्याच्या कुटुंबातील ५ जणांना जन्मठेप

Maghi Ganpati 2026: माघी गणपती जयंती का साजरी करतात? जाणून घ्या पौराणिक कथा

SCROLL FOR NEXT