Manoj Jarange Patil On Pankaja Munde Saam Tv
महाराष्ट्र

Beed News: मनोज जरांगे, पंकजा मुंडेंचे फोटो, 'कमळ' मात्र गायब; भाजप जिल्हाध्यक्षाने लावलेल्या फ्लेक्सची सर्वत्र चर्चा!

Beed Politics News: राजेंद्र मस्के यांचे हे फ्लेक्स सर्वांचे लक्ष वेधत आहेत. तसेच आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या बॅनरची मोठी चर्चा होत आहे.

Gangappa Pujari

बीड, ता. २७ सप्टेंबर

Manoj Jarange Patil, Pankaja Munde Banner: भारतीय जनता पक्षाचे बीड जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी लावलेल्या बॅनरची सध्या राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे. राजेंद्र मस्के यांनी भाजप नेत्या आणि विधानपरिषदेच्या आमदार पंकजा मुंडे यांच्यासह मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचे फोटो असलेले फ्लेक्स झळकावले आहेत. विशेष म्हणजे या बॅनरवर भाजपचे चिन्ह अन् उल्लेखही टाळल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, बीड भाजपाचे जिल्हाध्यक्ष व पंकजा मुंडे यांचे निकटवर्ती असलेल्या राजेंद्र मस्के यांनी लावलेले बीड शहरातील बॅनर चर्चेचा विषय ठरला आहे. मस्के यांनी लावलेल्या बैलगाडा शर्यतीच्या बॅनरवर पक्षाचे चिन्ह आणि उल्लेख टाळला आहे. एका बॅनरवर मनोज जरांगे पाटील यांचा फोटो टाकला आहे. ज्यावर पक्षाचा उल्लेख हि टाळला आहे.

तर दुसऱ्या बॅनरवर भाजपच्या पंकजा मुंडे यांचा फोटो टाकला आहे. त्या बॅनरवर मनोज जरांगे पाटील यांचा फोटो टाळला आहे. या दोन्ही बॅनरवर पक्षाचे चिन्ह आणि उल्लेख टाळला आहे. त्यामुळे नेमकं जिल्हाध्यक्षाचे प्रेम कुणावर? असा प्रश्न विचारत हे बॅनर सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

दरम्यान, राजेंद्र मस्के हे भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या कट्टर समर्थक म्हणून ओळखल्या जातात. मागील वर्षी बैलगाडा शर्यतीमध्ये पंकजा मुंडे यांनी राजेंद्र मस्के यांची उमेदवारी बीडमधून जाहीर केली होती. अशातच राजेंद्र मस्के यांचे हे फ्लेक्स सर्वांचे लक्ष वेधत आहेत. तसेच आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या बॅनरची मोठी चर्चा होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

T20 World Cup मध्ये टीम इंडियाची विजयी घोडदौड,सलग चौथा विजय; नेदरलँड्सचा १७ धावांनी पराभव

Crime: १३ वेळा चाकूने वार करत महिलेला संपवलं, नंतर आरोपीने धावत्या ट्रेनसमोर उडी मारली

Crime News: 'तो घरी परत यायला नको'; नवऱ्याला रस्त्यातून हटवण्यासाठी प्रियकरासोबत बायकोनं रचला भयानक कट

Shocking: बड्या राजकीय नेत्याच्या मुलाचा एन्काऊंटर, पोलिस अधिकाऱ्यावर केला होता गोळीबार

मोठी बातमी! ठाकरेंनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट; राज्याचा राजकारणाला हादरा

SCROLL FOR NEXT