Pankaja Munde Dhananjay  Munde
Pankaja Munde Dhananjay Munde  SaamTvNews
महाराष्ट्र

Beed: मुंडे बहीण-भावाच्या वादात परळीतील वैद्यनाथ महाविद्यालयावर प्रशासक?

विनोद जिरे

बीड: मुंडे - बहीण भावाच्या वादात परळी मधील नामांकित जवाहर एज्युकेशन सोसायटीच्या वैद्यनाथ महाविद्यालयावर प्रशासक नेमण्यात येणार आहे. दिवंगत लोकनेते गोपीनाथ मुंडे (Gopinath Munde) यांच्या ताब्यातील ही शिक्षण संस्था आहे. स्व. मुंडेच्या पश्चात जवाहर एज्युकेशन सोसायटीत संचालक मंडळावरून पालकमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) व भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांच्यात संघर्ष सुरू आहे. या संस्थेत सुरू असलेल्या वादामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr. Babasaheb Ambedkar) मराठवाडा विद्यापीठाच्या कुलसचिव यांनी, प्रशासक नेमण्यासाठी 4 जानेवारी रोजी त्रिसदस्यीय चौकशी समिती गठित केली आहे. या समितीने आपला अहवाल काल विद्यापीठाकडे सादर केला आहे. त्यामुळं मुंडे बहीण-भावाच्या या वादात वैद्यनाथ महाविद्यालयावर प्रशासक येण्याची शक्यता आहे.

डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे उपकुलसचिव डॉ.राजेभाऊ करपे, डॉ. फुलचंद सालामपुरे, डॉक्टर प्रतिभा अहिरे या तिघांची समिती नेमलीय. तर ही समिती जवाहर एज्युकेशन सोसायटीतील वादामुळे, गुन्हेगारी स्वरूपाचे प्रकरण घडणे, संस्थेतील गैरव्यवस्थापन, अध्यापक नियुक्ती संदर्भातील वाद, अध्यापकांची पदोन्नती यासह शैक्षणिक वातावरण याची चौकशी करत आहेत.

Edited By: Pravin Dhamale

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sharad Pawar: PM मोदींकडून पंतप्रधानपदाची अप्रतिष्ठा; लोकांना मुद्द्यांपासून वळवण्याचे काम सुरू... शरद पवारांचे टीकास्त्र

Today's Marathi News Live : उद्धव ठाकरे यांची आज सांगलीत सभा

High Cholesterol Level: उच्च कोलेस्ट्रॉलमुळे वाढतो हृदयविकाराचा धोका, मग आहारात करा बदल

IIM Mumbai Recruitment 2024 : नोकरीची सुवर्णसंधी! मुंबईतील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटमध्ये भरती, जाणून घ्या पात्रता आणि अटी

Loksabha Election: नगरमध्ये महाविकास आघाडीत फूट! ठाकरे गटाच्या बड्या नेत्याचा सुजय विखेंना पाठिंबा; निलेश लंकेंना बालेकिल्ल्यात धक्का

SCROLL FOR NEXT