Beed Accident News Uncle-niece killed in car accident, family 6 members injured Saam TV
महाराष्ट्र

Beed Accident: देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या कारला भीषण अपघात; मामासह ८ महिन्यांच्या भाचीचा जागीच मृत्यू

Beed Car Accident: बीड जिल्ह्यातून भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. बीड -पाथर्डी महामार्गावरील मानूर परिसरात भाविकांच्या कारला भीषण अपघात झाला.

विनोद जिरे

Beed Car Accident News: बीड जिल्ह्यातून भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. बीड -पाथर्डी महामार्गावरील मानूर परिसरात भाविकांच्या कारला भीषण अपघात झाला. या अपघातात मामासह ८ महिन्यांच्या भाचीचा दुर्देवी मृत्यू झाला, तर कुटुंबातील ६ जण जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. (Latest Marathi News)

गोकुळ नाईकनवरे (वय ४० वर्ष रा.तागडगाव) दिव्या मडके (वय ८ महिने रा. देवी निमगाव) अशी मृतांची नावे आहेत. देवदर्शनासाठी निघालेल्या मामासह भाचीचा अपघातात मृत्यू झाल्याने परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मयत ऊसतोड कामगार गोकुळ नाईकनवरे हे ऊसतोडणीची उचल घेऊन कुटुंबासह मोहटा देवीच्या दर्शनासाठी निघाले होते. दरम्यान शिरूर कासार तालुक्यातील (Beed News) मानूर परिसरात त्यांची भरधाव कार झाडावर धडकली.

हा अपघात (Accident) इतका भीषण होता की, मामा भाच्ची जागीच ठार झाले असून कुटुंबातील ६ जण जखमी झाले. लताबाई नाईकनवरे (वय ६०) उषाबाई नाईकनवरे (वय ३५), दादा गोकुळ (वय १४), प्रगती गोकुळ वय (१५), कोमल मडके वय (२४) आणि बाळू सटले (वय १८) अशी जखमींची नावे आहेत.

मयत गोकुळ नाईकनवरे हे ऊसतोड कामगार होते. ऊसतोडणीची उचल घेऊन आपल्या कुटुंबासहित ते मोहटादेवीच्या दर्शनासाठी निघाले होते. मात्र, वाटेतच त्यांच्यावर काळा घातला. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून शिरूर कासार पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking: मोबाइलची सवय सुटावी म्हणून मुलीला आजोळी पाठवलं, मामा अन् त्याच्या मुलानं केला बलात्कार

Maharashtra Live News Update: पुण्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं आंदोलन

Mumbai Pune Expressway : मोठी बातमी! पुण्याहून मुंबईला येणार्‍या सर्व एसटी बसेस रद्द, २१ तासांपासून एक्सप्रेस वे ठप्प, प्रवास टाळाच, कारण...

मी जातपात मानत नाही, माळी समाजाचा उल्लेख; अजितदादांनी मृत्यूआधी कॉलवर नाव घेतलेल्या नेत्याने सगळं काही सांगितलं

लोकसभेच्या गेटवर राडा! बघा गद्दार चालले; काँग्रेसमधून भाजपमध्ये गेलेल्या मंत्र्याला राहुल गांधींनी डिवचले, मंत्री म्हणाले...,

SCROLL FOR NEXT