Beed Accident News Saam tv
महाराष्ट्र

Beed Accident News : दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांची रिक्षा पलटी; ६ महीला भाविक गंभीर जखमी

दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांची रिक्षा पलटी; ६ महीला भाविक गंभीर जखमी

विनोद जिरे

बीड : बीडच्या माजलगाव तालुक्यातील पुरुषोत्तमपुरी येथे दर्शनासाठी चाललेल्या भाविकांच्या रिक्षा पलटी झाल्याने मोठा अपघात (Accident) झाला. यात ६ महिला भाविक गंभीर जखमी झाल्या आहेत. त्यांना तातडीने रुग्णालयात (Beed) दाखल करण्यात आले आहे. (Latest Marathi News)

अधिक मास सुरु झाल्याने अनेकजण देव दर्शनासाठी जात असतात. यंदा अधिक मास आला असून १८ जुलैला अधिक महिन्याला सुरवात झाली आहे. यामुळे आता भाविक देव दर्शणासाठी बाहेर पडत आहेत. असेच भगवान पुरुषोत्तमाच्या दर्शनासाठी काही भाविक रिक्षाने जात होते. त्यांच्या रिक्षाला अपघात झाला आहे. यात ६ महिला भाविक गंभीर जखमी झाल्या आहेत. 

अरुंद रस्त्यामुळे अपघात 

भाविकांच्या रिक्षाला अरुंद रस्त्यामुळे अपघात झाला आहे. यापूर्वी देखील ट्राफिक जाम व रस्त्याच्या खाली गाडी घसरणे यासह अनेक अपघात घडले आहेत. तसेच अरुंद रस्त्यामुळे अपघाताचे प्रमाण देखील वाढले आहे. दरम्यान प्रशासनाने तात्काळ रस्ता रुंद करावा, अशी मागणी होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today Gold Rate: सोन्याचे दर १०,००० रुपयांनी वाढले; ग्राहकांच्या खिशाला फटका; १० तोळ्याचे भाव किती?

Maharashtra Live News Update: मुंबई गोवा महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी

गंगा स्नानाला जाताना काळाचा घाला, ट्रकने ऑटोला चिरडले, ८ जणांचा जागीच मृत्यू, ५ जखमी

War 2 VS Coolie Collection : रजनीकांत यांचा बॉक्स ऑफिसवर दबदबा, 'वॉर 2' अन् 'कुली' कोणी किती कमावले?

अमित ठाकरेंची आशिष शेलारांसोबत बैठक; नेमकी काय चर्चा झाली? अमित ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं

SCROLL FOR NEXT