Majalgaon Road Mishap: 
महाराष्ट्र

माजलगाव तहसील कार्यालयासमोर भीषण अपघात; कार आणि दुचाकीची समोरासमोर धडक, 14 वर्षीय मुलाचा जागीच मृत्यू

Majalgaon Road Mishap: बीड जिल्ह्यातील माजलगाव तहसील कार्यालयाजवळ कार आणि दुचाकीचा भीषण अपघात झालाय. यात दुचाकी आणि कारचा चुराडा झालाय.

Bharat Jadhav

  • कार आणि दुचाकीच्या समोरासमोर धडकेत 14 वर्षीय मुलाचा जागीच मृत्यू झाला.

  • ही दुर्घटना बायपास रोडवरील तहसील कार्यालयासमोर सायंकाळी घडली.

  • अपघातात आणखी दोघेजण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

योगेश काशिद, साम प्रतिनिधी

बीडमधील माजलगाव शहरातील कार आणि दुचाकीचा भीषण अपघात झालाय. शहरातील बायपास रोडवरील तहसील कार्यालयासमोर सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास हा भीषण अपघात घडला. एमएच 12 एचएफ 3623 क्रमांकाची कार आणि एमएच 44 एएफ 2395 क्रमांकाची दुचाकीची समोरासमोर जोरदार धडक झाली. या अपघातात 14 वर्षीय मुलाचा जागीच मृत्यू झाला, तर दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत.

मृत मुलाचे नाव करीम खदीर शेख (वय 14 रा. इंदिरानगर, माजलगांव असे आहे. करीम हा आपल्या चुलत भावासह मोटारसायकल वरून बायपास रोडने संभाजी चौकाकडे जात होता. त्याचवेळी समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या कारने मोटारसायकलला जोरदार धडक दिली.

धडक इतकी भीषण होती की, इर्टीका कारचा समोरील भाग पूर्णपणे दबला, तर मोटारसायकलचा अक्षरशः चुराडा झाला. या अपघातात मोटारसायकलच्या पाठीमागे बसलेल्या करीम खदीर शेख याचा जागीच मृत्यू झाला.

प्रवाशांनी खचाखच भरलेली रस्त्याच्या कडेला उलटली

सांगलीमध्ये भीषण अपघाताची घटना समोर आली. प्रवाशांनी खाचखच भरलेल्या खासगी ट्रॅव्हल्सला भीषण अपघात झाला. भरधाव बस रस्त्याच्या कडेला उलटली. या अपघातामध्ये दोघांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये बस चालकाचा समावेश आहे. अपघाताची ही घटना पलूसच्या घोगाव येथे घडली. या अपघातामध्ये बसमधील १५ प्रवासी जखमी झाले. सांगलीच्या पलूस तालुक्यातील घोगाव येथे खासगी ट्रॅव्हल्स बसला भीषण अपघात झाला. चालकाचा बसवरील ताबा सुटल्यानं हा अपघात घडला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Devendra Fadnavis: आंदोलनात बाहेरचे लोक घुसलेत; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया

Maharashtra News Live Update: शरद पवार जंतरमंतरवर अभिजीत दिपकेंच्या भेटीला

दिल्लीतील आंदोलनात महाराष्ट्रातील दोन दिग्गज नेत्यांना अटक; राजकीय वर्तुळात मोठी खळबळ

Maharashtra Politics: मोठी बातमी! भाजपला मोठा धक्का, दिग्गज महिला नेत्याचा तडकाफडकी राजीनामा

Blocked blood vessels: शरीरातील रक्तवाहिन्या ब्लॉक होऊ लागल्या की पायांमध्ये दिसतात ही 3 लक्षणं

SCROLL FOR NEXT