"२४ तास सतर्क राहा" बीड जिल्हा प्रशासनाला मुंडेंच्या सूचना! Saamtv
महाराष्ट्र

"२४ तास सतर्क राहा" बीड जिल्हा प्रशासनाला मुंडेंच्या सूचना!

अतिवृष्टीमुळे बीड जिल्ह्यात कुठेही जीवित किंवा वित्त हानी होऊ नये यासाठी २४ तास सतर्क रहा जिल्हा प्रशासनाला पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या सूचना.

विनोद जिरे

बीड : बीड जिल्ह्यात अनेक भागात मुसळधार पाऊस पडला असून, बहुतांश भागात अजूनही पाऊस सुरू आहे. तसेच काही तालुक्यात आणखी पाऊस पडण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने २४ तास सतर्क राहून आवश्यक तिथे मदत कार्य करावे. अशा सूचना पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी जिल्हा प्रशासनाला दिल्या आहेत.

हे देखील पहा -

अनेक ठिकाणी खरीप पिकांचे व फळ बागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून पावसाने उघडीप देताच विमा कंपनी, महसूल व कृषी विभागामार्फत पंचनामे करण्याची प्रक्रिया तातडीने सुरू करण्यात येईल. नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा व मदत देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील. काही गावांचा संपर्क तुटल्याचे देखील वृत्त येत आहे, त्यामुळे आधी नागरिकांच्या सुरक्षा उपाययोजना करण्यासाठी प्रशासनाने सज्ज रहावे, कुठेही जीवित किंवा वित्त हानी होणार नाही. या दृष्टीने तातडीने उपाययोजना कराव्यात. असे निर्देश देखील धनंजय मुंडे यांनी जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांना दिले आहेत.

पावसाचा तडाखा पूर्णपणे कमी होईपर्यंत नागरिकांनी काळजी घ्यावी, धोक्याचे ठिकाण, जलाशय, वाहत्या नद्या अशा ठिकाणी जाण्याचे टाळावे व प्रशासनाला सहकार्य करावे. असे आवाहन देखील धनंजय मुंडे यांनी जिल्हावासीयांना केले आहे.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

सरकारचा मोठा निर्णय; शाळा–रुग्णालय परिसरात कुत्रे सोडणाऱ्यांना दंड

'Bigg Boss Marathi'च्या 6 व्या सीझनची घोषणा! रितेश देशमुख की महेश मांजरेकर कोण करणार होस्टिंग? 'या' नावाची तुफान चर्चा

Accident: 'ती' भेट अखेरची ठरली! मित्रांसोबत पार्टी, घराकडे जाताना काळाचा घाला; अपघातात IIM च्या विद्यार्थ्याचा मृत्यू

Maharashtra Live News Update : शिरुर नगरपरिषदेत आजी माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला, महिला उमेदवार मैदानात

Sambhaji Nagar: धक्कादायक! बनावट कागदपत्रे, सहा महिन्यापासून हॉटेलमध्ये महिलेचे वास्तव्य, पाकिस्तान कनेक्शन झाले उघड

SCROLL FOR NEXT