सावधान ! फास्ट टॅग वरुनही सायबर चोरटे उकळत आहेत पैसे SaamTv
महाराष्ट्र

सावधान ! फास्ट टॅग वरुनही सायबर चोरटे उकळत आहेत पैसे

फास्टटॅग वरून पैसे उकळण्याचा सायबर चोरट्यांचा धक्कादायक प्रकार आता उघडकीस येऊ लागला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अश्विनी जाधव केदारी

पुणे : फास्ट टॅग वरून पैसे उकळण्याचा सायबर चोरट्यांचा धक्कादायक प्रकार आता उघडकीस येऊ लागला आहे. केंद्र सरकारच्या आदेशानुसार देशातील सर्व टोल नाक्यावर फास्ट टॅग बंधनकारक केल्यानंतर आता सायबर चोरट्यांनी यावर नजर वळवली असून, गाडी घरात अन तरीही गाडी टोलनाका क्रॉस केल्याची एन्ट्री आणि पैसे कट होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.Be careful! Cyber thieves are also making money from fast tags

हे देखील पहा -

तर काही प्रकरणात फास्टटॅगला रिचार्ज करून देतो, असे म्हणत चोरटे गोपनीय माहिती घेऊन पैसे उकळत आहेत. याबाबत पुणे पोलिसांकडे तक्रारी आल्या आहेत. तसेच सायबर पोलीस ठाण्यात एकूण 9 तक्रारी आल्या आहेत. त्यानुसार सायबर पोलिसांनी तपास सुरू केला आहे. आतापर्यंत पुणे पोलिसांच्या सायबर शाखेकडे पुण्यातून 9 तक्रारी आल्या आहेत. यात 6 तक्रारी या टोलनका क्रॉस केलेला नसताना आणि गाड्या घरी असूनही पैसे कट झाले आहेत अश्या स्वरूपाच्या आहेत.

सर्वाधिक पैसे कट झाल्याची एक तक्रार दीड हजाराची आहे. तर एक तक्रार 79 रुपये कट झाल्याची आहे. तसेच तीन तक्रारी या सायबर चोरट्यांनी फास्ट टॅग धारक वाहन चालकाना फोनकरून तुमचा फास्ट टॅगचा रिचार्ज करून देतो, असे सांगत त्यांच्या खात्याची गोपनीय माहिती मिळवली आहे. त्यामाध्यमातून त्यांच्या खात्यातून पैसे गायब केले आहेत.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chhaya Kadam On Bigg Boss: 'हिंदी बिग बॉस'ची ऑफर आली...'; छाया कदम लवकरच सलमान खानच्या शोमध्ये झळकणार?

Maharashtra News Live Update: शिवसेनेवर अंतिम शिक्कामोर्तब? शिंदे-ठाकरे वादावर सुप्रीम कोर्टात आज सुनावणी

DA Hike : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी खुशखबर! डीए वाढीची प्रतीक्षा संपली; सरकारने जारी केलं अधिकृत नोटिफिकेशन, जाणून घ्या कोणाला लाभ

Property Dispute: वडिलांच्या प्रॉपर्टीवर मुलं हक्क सांगू शकतात का? वडिलोपार्जित संपत्तीवर कोर्टाची महत्त्वाची टिप्पणी

Coffee Benefits: दिवसाची सुरुवात कॉफीने करता? रिकाम्या पोटी कॉफी पिण्याचे फायदे-तोटे जाणून घ्या

SCROLL FOR NEXT