Nashik Cyber Police Station Saam Tv
महाराष्ट्र

सायबर गुन्ह्यांबाबत जागरुक रहा; शहर पाेलिसांच्या नाशिककरांना टिप्स

बनावट ग्राहक सेवा क्रमांक अपलोड करुन पैश्यांची मागणी

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

तबरेज शेख

नाशिक - आर्थिक व्यवहार ऑनलाइन करण्याचा कल वाढत असल्याने त्यातून सायबर गुन्हे घडण्याची शक्यता आहे. विशेषत: आता गणेशाेत्सवात गणेशमूर्ती, लाइट्स या विक्रीसहित इतर कारणातून आर्थिक फसवणुकीची शक्यता असून नाशिककरांनी या गुन्ह्यांंपासून ‘अलर्ट’ रहावे, असे आवाहन सायबर पोलिसांनी (Cyber Police) केले आहे. विशेष म्हणजे या सायबर लुटीपासून बचाव करण्यासाठी पाेलिसांनी काही टिप्स सुद्धा दिल्या आहेत.

सायबर गुन्हेगार नवीन फंडे वापरून नागरिकांना गंडा घालत आहेत. यामध्ये चुकीच्या क्रमांकावरुन फोन करुन आर्थिक फसवणूक करण्यासह ई-पेमेंटच्या माध्यातून गंडा घालणाऱ्याचा समावेश आहे. गणेशोत्सवाच्या कालावधीत ई-व्यवहार वाढल्यास गुन्ह्यांत वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

हे देखील पाहा -

तर, दुसरीकडे या कालावधीत गणेशोत्सवात मंडळे, निवासी सोसायटी, विविध क्लबसहित शाळा-महाविद्यालये, संस्थांमध्ये प्रबोधन कार्यक्रम घेण्याचा निर्णय झाला आहे. पोलिस त्यासाठी नियोजन करीत असून, प्रबोधनासाठी इच्छुक संस्थांनाही पोलिसांशी संपर्क साधता येईल. या कारणे देत होते फसवणूक

लोन अ‍ॅप बदळी पडून नका. अ‍ॅक्सेस देऊ नका. लोन अ‍ॅप फसवणुकीस बळी पडल्यास ते अ‍ॅप मोबाईलमधून अनइन्स्टॉल करावे. स्क्रिन शेअरिंग अ‍ॅपमुळे बँक अकाउंट नंबर, पिन नंबर सायबर गुन्हेगारांना समजतो. कोणत्याही कंपनीचा कस्टमर केअर नंबर गुगलवर सर्व करु नये.

एनी डेस्क, क्वीक सपोर्ट, टीम व्ह्यूवर या प्रकारचे शेअरिंग अ‍ॅप डाउनलोड करु नये. अनधिकृत व्यक्तीने पाठविलेली लिंक ओपन करु नये. अनोळखी व्यक्तीची फ्रेन्ड रिक्वेस्ट अ‍ॅक्सेप्ट करु नये. अनोळखी व्यक्तीच्या नंबर वरुन व्हिडीओ कॉल आल्यास स्विकारु नये. भूलथापांना बळी पडू नये असे आवाहन नाशिक शहर पाेलिसांकडून नागरिकांना करण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

EPFO News : EPFO ने केला मोठा बदल! पीएफ ट्रान्सफरसाठी HR ची गरज नाही, नोकरी बदलल्यावर २ दिवसात पैसे ट्रान्सफर होणार

Maharashtra Live News Update : मावळात राष्ट्रवादी काँग्रेसकडून जिल्हा परिषदेसाठी पहिली उमेदवारी जाहीर

Sambar Recipe: साऊथ इंडियन स्टाईल सांबर कसा बनवायचा? सोपी रेसिपी

Panchami Tithi: शरद ऋतु, पंचमी तिथि आणि चंद्र मिथुन राशीत; या राशींना मिळणार प्रोत्साहन व नवा प्रवास

Rashmika Mandanna: 'विजयसोबत लग्न करणार...'; अखेर रश्मिकाने कबूल केलंच, तो व्हिडिओ व्हायरल अन् चर्चांना उधाण

SCROLL FOR NEXT