Assembly Election 
महाराष्ट्र

Baramati Politics: पवार विरुद्ध पवार संघर्ष; बारामतीच्या मैदानात पवार बंधू आमनेसामने?

Assembly Election : बारामतीत लोकसभेप्रमाणेच विधानसभेलाही वातावरण तापलंय...युगेंद्र पवार आणि जय पवारांनी यात्रा आणि भेटीगाठींवर जोर द्यायला सुरुवात केलीय. पवार कुटुंबियांच्या विधानसभा निवडणुकीच्या तयारीवरचा हा स्पेशल रिपोर्ट.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

भरत मोहळकर, साम प्रतिनिधी

विधानसभा निवडणुकीपूर्वीच अजित पवारांनी बारामतीतून न लढण्याचे स्पष्ट संकेत दिलेत. त्यापार्श्वभूमीवर अजित पवारांचा मुलगा जय पवार यांनी बारामतीत भेटीगाठीच्या माध्यमातून वातावरण तापवायला सुरुवात केलीय.तर शरद पवारांच्या पक्षाचे अजित पवारांचे पुतणे युगेंद्र पवारांनी बारामतीतून स्वाभिमान यात्रेला सुरूवात केलीय. त्यामुळे बारामतीत पवारा बंधूंमध्ये सामना रंगण्याची शक्यता दिसतेय.

अजित पवारांनी बारामतीतून लढण्यास इच्छूक नसल्याचे दुस-यांदा संकेत दिले आहेत. त्यामुळे त्यांचा लहान मुलगा जय पवारांनी गणेशोत्सवाच्या निमित्तानं गणेश मंडळाच्या गाठीभेटी घेऊन तयारी सुरू केल्याचं बोललं जातंय.

अजित पवारांनी बारामती सोडण्याचे संकेत देताच आता जय पवारांनी मतदारसंघात जनसंपर्क वाढवायला सुरुवात केलीय. त्यातच गणेश मंडळांना भेटी देत आरती करत जय पवार बारामती पिंजून काढत आहेत. दुसरीकडे लोकसभेला सुप्रिया सुळेंसाठी प्रचाराची धुरा सांभाळणाऱ्या युगेंद्र पवारांनाही खुद्द शरद पवारांनीच ताकद द्यायला सुरुवात केलीय.

त्यामुळे लोकसभेनंतर पुन्हा विधानसभेला पवार बंधुंमध्ये लढत होण्याची शक्यता आहे. तर या लढतीत पुन्हा एकदा शरद पवार आणि अजित पवार यांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे. त्यामुळे पवार काका-पुतण्यात लढत रंगणार की पवार बंधू आमनेसामने येणार याबाबत उत्सुकता वाढलीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Salary Planning : UPI वापरता, पण पैशांचे नियोजन करता का? पगार मिळण्याआधीच शिका या ५ बचतीच्या गोष्टी

Red hammer in train: ट्रेनमध्ये असलेला लाल हातोडा नेमका कशासाठी? 99% प्रवाशांना माहीत नाही खरं कारण!

Married Life : नवरा-बायकोत सतत भांडण होतंय? बेडरूममधील या चुका असू शकतात कारणीभूत

Homemade Alshi Gel: नॅचरल ग्लो आणि सिल्की केसांसाठी घरी बनवा 'हा' जेल; 2 आठवड्यात दिसेल फरक

Maharashtra News Live Update: राहुल गांधींना मुंबई हायकोर्टाचा झटका; मानहानी प्रकरणातील समन्स रद्द करण्याची याचिका फेटाळली

SCROLL FOR NEXT