Baramati Crime Saam tv
महाराष्ट्र

Baramati Crime : तिप्पट रक्कम परतावा देण्याचे आमिष; सव्वा आठ लाखांची फसवणूक, बारामतीत दोघांवर गुन्हा

Baramati news : फसवणूक करण्याचे अनेक प्रकार सध्या समोर येत आहे. यात प्रामुख्याने सायबर गुन्हेगारी वाढली आहे. अशात देखील पैसे गुंतवणूक करण्याचे सांगून त्या बदल्यात अधिक परतावा देण्याचे आमिष देत फसवणूक करण्यात येत असते.

मंगेश कचरे

बारामती : रक्कम गुंतवणूक करून त्या बदल्यात तिप्पट रक्कम देण्याचे आमिष एकाजनाला चांगलेच महागात पडले आहे. बारामतीमध्ये हा प्रकार उघडकीस आला असून तिप्पट रक्कमेचा परतावा देण्याचे आमिष दाखवून एकाची तब्बल ८ लाख ३० हजार रुपयात फसवणूक झाली आहे. या प्रकरणी बारामती तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांकडून तपास सुरु आहे. 

फसवणूक करण्याचे अनेक प्रकार सध्या समोर येत आहे. यात प्रामुख्याने सायबर गुन्हेगारी वाढली आहे. अशात देखील पैसे गुंतवणूक करण्याचे सांगून त्या बदल्यात अधिक परतावा देण्याचे आमिष देत फसवणूक करण्यात येत असते. असाच प्रकार बारामतीमध्ये समोर आला आहे. यात तुम्ही पैसे दिले तर एक रुपयाचे तीन रुपये परत करू; असे तिप्पट रकमेचे आमिष एकाला दाखवत टप्प्याटप्प्याने आठ लाख ३० हजार रुपयाची फसवणूक केली. 

पोलिसात दोघांवर गुन्हा 

दरम्यान आपण दिलेली रक्कमेची तिप्पट रक्कम तर नाहीच; पण दिलेली रक्कम देखील देण्यास टाळाटाळ करण्यात येत असल्याने  या प्रकरणी बारामती तालुका पोलीस ठाण्यात दोघा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अक्षय बाळू पवार यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे. पोलिसांकडून याबाबत तपास सुरु करण्यात आला आहे. 

पिंपळे येथे दोन गटात हाणामारी
बारामतीच्या इंदापूर तालुक्यातील पिंपळे येथे शेतातील वादावरून दोन गटात हाणामारी झाली. यात शेतीवरून झालेल्या भांडणात एका महिलेच्या तक्रारीवरून भिगवण पोलिसांनी सात जणाव विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तर दुसऱ्या गटातील महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून सहा जणांवरील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोघांच्या परस्परविरोधी फिर्यादीवरून भिगवण पोलिसांनी १३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

२०२९ आधीच मोदी-शहा पायउतार होणार, राऊतांच्या वक्तव्याने दिल्लीच्या राजकारणात मोठा भूकंप

Maharashtra News Live Update: सीजीपीचे संस्थापक अध्यक्ष अभिजीत दिपके मनोज जारंगे पाटील यांच्या भेटीला

High Blood Pressure: रात्रीच्या वेळी अचानक BP वाढतोय? झोपण्यापूर्वी ही 3 ड्रिंक्स प्या

8th Pay Commission : जुन्या पेन्शनर्ससाठी मोठी अपडेट! PM मोदींकडे थेट मागणी; 8व्या वेतन आयोगात होऊ शकतो बदल

Maheshwari Saree Designs: महिलांसाठी महेश्वरी साड्यांचे लेटेस्ट कलेक्शन, या 5 डिझाईन्स तुम्हाला नक्की आवडतील

SCROLL FOR NEXT