Bhandara News : धान खरेदीसाठी ऑनलाईन पोर्टलवर नोंदणीसाठी मुदतवाढ; शेतकऱ्यांना होणार फायदा

Bhandara Farmer News : खरीप पणन हंगाम २०२४-२५ मध्ये किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत धान खरेदीसाठी ऑनलाईन पोर्टलवर शेतकरी नोंदणी करण्याकरिता ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
Bhandara News
Bhandara NewsSaam tv
Published On

शुभम देशमुख 

भंडारा : शेतकऱ्यांकडून धान खरेदीसाठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन पोर्टलवर नोंदणी करणे आवश्यक आहे. मात्र दिलेल्या मुदतीत अनेक शेतकऱ्यांची नोंदणी करण्याचे काम अजून बाकी राहिले आहे. यामुळे धान खरेदीसाठी ऑनलाईन पोर्टलवर नोंदणी करण्यासाठी ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. 

खरीप पणन हंगाम २०२४-२५ मध्ये किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत धान खरेदीसाठी ऑनलाईन पोर्टलवर शेतकरी नोंदणी करण्याकरिता ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. दरम्यान आमदार परीणय फुके यांच्या मागणीची दखल घेत हा मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. याचा आता शेतकऱ्यांना फायदा होणार असून धान मालाला चांगला भाव मिळणार आहे. 

Bhandara News
Bus Accident : उभ्या ट्रॅक्टरला बसची धडक; एकाचा जागीच मृत्यू, २१ प्रवासी जखमी

पोर्टलवरील नोंदणीसाठी १५ डिसेंबर २०२४ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. मात्र, नोंदणी केंद्रावरील गर्दीमुळे नोंदणी प्रक्रिया अद्याप पूर्ण झाली नाही. शेतकरी धान खरेदी नोंदणीपासून वंचित राहू नये. यासाठी मुदतवाढ देण्याची मागणी आमदार परीणय फुके यांनी मागणीची दखल घेत अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाचे प्रधान सचिवांशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधत शेतकरी नोंदणीकरीता मुदतवाढ देण्यात आली.

Bhandara News
Cotton Price : कापसाला भाव नाही; रस्त्यावर कापूस पेटवून देत शेतकऱ्यांकडून सरकारचा निषेध

शेतकऱ्यांना होणार फायदा 

धन खरेदी पोर्टलवर शेतकऱ्यांनी नोंदणी केल्यास हमीभावानुसार माल खरेदी केला जात असतो. यासाठी या पोर्टलवर नोंदणी आवश्यक आहे. नोंदणी न करणाऱ्या शेतकऱ्यांना खासगी विक्री केंद्रावर मिळेल त्या दरात धान विक्री करावी लागत असते. दरम्यान १५ डिसेंबरपर्यंत दिलेल्या मुदतीत अनेक शेतकऱ्यांची नोंदणी करणे बाकी राहिले आहे. अशा शेतकऱ्यांसाठी पंधरा दिवसांची मुदत वाढवून देण्यात आली आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com