Baramati News Saam TV
महाराष्ट्र

Baramati News: मद्यधुंद तरुणांचा बारामतीत कोयते दाखवत धिंगाणा ; तमा न बाळगता गावकऱ्यांवर केला हल्ला

बारामतीमधील ४ ते ५ युवक दारू पिऊन दुचाकीवरून फिरत होते.

साम टिव्ही ब्युरो

Baramati News: मद्यधुंद अवस्थेतील व्यक्ती कधी काय करेल याचा काही नेम नसतो. दारूच्या नशेत मनाला वाटेल तसे अनेक जण वागतात. यात काही व्यक्तींच्या वागण्याचा इतरांना विनाकारण त्रास सहन करावा लागतो. बारामतीमध्ये देखील अशीच एक घटना घडली आहे. ४ ते ५ मद्यपेयींनी दारू पिऊन धुमाकूळ घातला. दारू पिऊन हातात कोयता घेत हे तरुण गावभर दहशत पसरवण्यासाठी फिरत होते. यामुळे बारामतीमधील नागरिकांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. (Latest Marathi News)

प्राप्त माहितीनुसार, काल शनिवारी बारामतीमधील ४ ते ५ युवक दारू पिऊन दुचाकीवरून फिरत होते. गावातील नागरिकांना घाबरवण्यासाठी त्यांनी हातात कोयता आणि तलवारी घेतल्या होत्या. कोयत्याचा धाक दाखवत त्यांनी संपूर्ण गावात उच्छाद मांडला. त्यांच्यामुळे संपूर्ण गावात भीतीचे वातावरण पसरले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सायंकाळी एका टोळक्याने एमआयडीसी आणि शहरातील टीसी कॉलेज (College) परिसरात आधी राडा केला. त्यांनी कॉलेजच्या परिसरात असलेल्या एका हॉटेलवर हल्ला केला. हॉटेलच्या मॅनेजरला शिवीगाळ करत त्याच्यावर त्यांनी कोयता आणि तलवारीने वार करण्याचा प्रयत्न केला. ही दृश्य पाहून हॉटेलमधील सर्व व्यक्ती जीव मुठीत घेऊन पळून गेले.

त्यानंतर रेल्वे गेटजवळ येऊन त्यांनी एका व्यक्तीचा फोन हिसकावून घेतला. इतक्यावरच ही टवाळ मुलं थांबली नाहीत नंतर ते दुचाकीने पेट्रोलपंपावर गेले. तेथे गेल्यावर देखील तलवार आणि कोयत्याने त्यांनी सर्वांना धाक दाखवण्याचा प्रयत्न केला. पेट्रोल भरून झाल्यावर त्याचे पैसे मागत असताना एकाने त्या कर्मचाऱ्यावर तलवारीने हल्ला केला. याच पेट्रोल कर्मचाऱ्याने वार चुकवल्याने दुसऱ्या व्यक्तीला ही तलवार लागली.

रस्त्यावरून जाताना या मद्यपेयी मुलांनी घातलेला धुमाकूळ रस्त्यावर असलेल्या सीसीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. यात त्यांनी रस्यावर असलेले वीजेचेखांब तसेच झाडे, दुकाने यांचे नुकसान केले आहे. दुकाणात गेल्यावर त्यांना हवी असलेली वस्तू घेऊन ही मुलं बाकीच्या वस्तू खाली फेकून देत होती. हॉटेलमध्ये देखील त्यांनी जेवणाची आणि भांड्यांची नासधूस केली.

या सर्व घटनांमुळे एकाच वेळी बारामती पोलीस ठाण्यात अनेक तक्रारी दाखल झाल्या. नागरिकांनी दिलेल्या तक्रारीनुसार पोलीसांनी मद्यपेय मुलांचा शोध घ्यायला सुरूवात केली. यातील दोन मुलांना पकडण्यात पोलिसांना (Police) यश आले आहे. तसेच इतरांचा शोध सुरू आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kolhapur Politics: मधुरिमाराजेंच्या माघारीची INSIDE STORY; कोल्हापूर उत्तर मतदारसंघात काय घडलं?

Assembly Election: एकनाथ शिंदे आणि राज ठाकरेंमध्ये संघर्ष; शिंदेविरुद्ध दोन ठाकरे

Maharashtra Election: महायुतीनं केलंय काम भारी! लाडक्या बहिणींना मिळणार २१०० रुपये, कोल्हापुरात महायुतीची १० वचनं

Maharashtra News Live Updates: भाजपचा मनसेचे उमेदवार बाळा नांदगावकर यांना पाठिंबा

Uddhav Thackeray: पीएम मोदींच्या अशुभ हातांनी बांधलेला पुतळा पडला'; उद्धव ठाकरेंची टीका

SCROLL FOR NEXT