Flower Price Saam Tv
महाराष्ट्र

Flower Price: फुलांना सोन्याचे दिवस, लग्नसराईमुळे दर वाढले, शेतकरी सुखावला

इंदापूर फुल बाजाराने नवा उच्चांक गाठला आहे.

मंगेश कचरे

बारामती: कोरोनामुळे गेल्या दोन वर्षांपासून अनेक निर्बंध होते. त्यात राज्यातील मंदिरंही बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यामुळे फुल उत्पादक शेतकऱ्यांना आणि व्यापाऱ्यांना मोठ्या संकटाचा सामना करावा लागला होता. आता राज्यातील सर्व मंदिरे खुली झाली आहेत, तसेच लग्न सोहळे देखील पूर्वीप्रमाणे होत आहेत. त्यामुळे फुलांच्या दरात चांगलीच वाढ झाली आहे (Baramati Indapur Flower Market Flower Price Increases Due To Increase In Demand).

बारामतीतील (Baramati) इंदापूरमध्ये (Indapur) चालू महिन्यात फुलांना चांगली मागणी असल्याने गेल्या वर्षापासून स्थिर असलेल्या फुलांच्या भावात (Flower Price) अचानक वाढ झालीये. त्यामुळे फुल बाजाराने नवा उच्चांक गाठला आहे.

इंदापूर तालुक्यासह आजूबाजूच्या तालुक्यातील आणि खेड्यातील शेतकरी (Farmer) इंदापूर शहरातील जुन्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात भरत असलेल्या फुल बाजारात आपली फुले घेऊन येतात. सदर फुलांना चांगला दर मिळत असल्याची माहिती फुल व्यापारी, रॉयल ट्रेडिंग कंपनीचे सर्वेसर्वा सुपिया खान जमादार आणि संदिप सेठ शिंदे यांनी दिली आहे.

इंदापूर बाजारपेठेतील फुलांचे दर प्रति किलो पुढील प्रमाणे -

झेंडू - 30 ते 40

गुलछडी - 150 ते 230

बिजली - 80 ते 140

तुळजापुरी - 10 ते 30

गुलाब - 18 ते 27 पेंडी

पासली - 20 ते 22 पेंडी

गजरे - 300 ते 500 शेकडा

गंलाडा - 40 ते 70

Edited By - Nupur Uppal

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मंत्र्यांची मालामाल खाती, निवडणुकीसाठी? कोण जिरवणार मंत्र्यांची मस्ती?

Maharashtra Live News Update: मनमाड नगरपरिषदेच्या प्रभाग क्रमांक १० ची निवडणूक स्थगित

Thursday Horoscope: ५ राशींचा पाण्यासारखा पैसा होणार खर्च, काहींचे होतील वाद, वाचा गुरुवारचे राशीभविष्य

Ayushman Bharat: ५ लाख नाही तर १० लाखांपर्यंत मोफत उपचार; कोणत्या कुटुंबांना होणार फायदा? वाचा सविस्तर माहिती

पुणेकरांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार, मेट्रोचं जाळं विस्तारणार; 31 किमी लांबीच्या २ मार्गिका अन् २८ स्थानके

SCROLL FOR NEXT