Summary:
बारामतीमध्ये पोलिस कोठडीत आरोपीची आत्महत्या
वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्यातील घटना
बलात्कार प्रकरणी ५५ वर्षीय आरोपीला पोलिसांनी केली होती अटक
पॅन्टच्या सहाय्याने गळफास घेत आयुष्य संपवलं
बारामतीमध्ये बलात्कार प्रकरणातील आरोपीने आत्महत्या केली. बारामतीच्या वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्यात ही घटना घडली. ५५ वर्षीय आरोपीने पॅन्टच्या सहाय्याने गळफास घेत आत्महत्या केली. सोमवारी रात्री ही घटना घडली. या घटनेमुळे पोलिस ठाण्यात एकच गोंधळ उडाला. आरोपीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. पोलिस सध्या तपास करत आहेत. या घटनेमुळे बारामतीत खळबळ उडाली.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीने आपल्याच नात्यातील १३ वर्षांच्या मुलीवर बलात्कार केला होता. या प्रकरणी वडगाव निंबाळकर पोलिसांनी त्याला शनिवारी अटक केली होती. अटकेनंतर आरोपीला बारामती न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयाने आरोपीला ५ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली होती. पोलिस आरोपीची कसून चौकशी करत होते. पण सोमवारी रात्री आरोपीने पोलिस कोठडीत आयुष्य संपवलं.
पोलिसांनी सांगितले की, ५५ वर्षीय आरोपीने १३ वर्षांच्या मुलीवर बलात्कार केला होता. पीडित मुलगी त्याच्या नात्यातीलच होती. पीडित मुलीच्या आईने वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली होती. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी आरोपीविरोधात पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करत त्याला अटक केली. त्याने पोलिस कोठडीत आत्महत्या केली.
दरम्यान, आरोपी गेल्या अनेक दिवसांपासून पीडित मुलीवर बलात्कार करत होता. घाबरून पीडित मुलीने ही गोष्ट कुणालाच सांगितली नव्हती. पीडित मुलगी गर्भवती राहिल्यानंतर हे प्रकरण समोर आले. पीडित मुलीच्या कुटुंबातील व्यक्तींच्या संगनमताने फलटणमधील एका डॉक्टरच्या रुग्णालयात तिचा गर्भपात केला होता, अशी धक्कादायक माहिती या प्रकरणातून समोर येत आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.