Sunetra Pawar  saam tv
महाराष्ट्र

Sunetra Pawar: मोठी बातमी! सुनेत्रा पवारांविरोधात काँग्रेसने दिला उमेदवार, बडा नेता निवडणुकीच्या रिंगणात

Baramati Bypoll: बारामती पोटनिवडणूक बिनविरोध होणार नसल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. कारण काँग्रेसने सुनेत्रा पवार यांच्याविरोधात उमेदवार दिला आहे. काँग्रेसने वकील आकाश मोरे यांना उमेदवारी दिली.

Priya More

Summary -

  • बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसची एंट्री

  • आकाश मोरे यांना उमेदवारी जाहीर

  • सुनेत्रा पवारांविरोधात थेट लढत

  • निवडणूक बिनविरोध होणार नाही

बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने सुनेत्रा पवार यांच्याविरोधात उमेदवार दिला आहे. काँग्रेसने आकाश मोरे यांना मैदानात उतरवलं आहे. काँग्रेसने प्रसिद्धी पत्रक काढून आकाश मोरे यांना उमेदवारी दिली असल्याची अधिकृत घोषणा केली. त्यामुळे बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध होणार नसल्याचे निश्चित झाले आहे. महत्वाचे म्हणजे सुनेत्रा पवार यांच्याविरोधात ओबीसी नेते लक्ष्मण हाके हे देखील निवडणूक लढणार आहेत.

राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आकस्मित निधनानंतर बारामतीची जागा रिक्त झाली होती. या रिक्त जागेसाठी पोटनिवडणूक होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या निवडणूक लढवणार आहेत. ही निवडणूक बिनविरोध व्हावा यासाठी महायुतीकडून प्रयत्न सुरू आहेत.

ही निवडणूक बिनविरोध करण्याचे त्यांनी सर्व राजकीय पक्षांना आवाहन केले. पण काँग्रेसने या निवडणुकीसाठी आपला उमेदवार ठरवला आहे. त्यांनी वकील आकाश मोरे यांना उमेदवारी दिली. आकाश मोरे यांनी यापूर्वी २०१४ मध्ये काँग्रेसकडून बारामती विधानसभा निवडणूक लढवली होती.

उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आकाश मोरे यांनी सांगितले की, 'खूप आनंद वाटतोय. एक जबाबदारी देखील आहे. पुणे जिल्ह्यात आम्हाला काँग्रेस पक्ष वाढवायचा आहे. बारामतीसारख्या ठिकाणी जे कुणी काँग्रेसची लोकं आहेत त्यांना मताचा अधिकार द्यायचा आहे. ही निवडणूक अंत्यत प्रामाणिक आणि संक्षमपणे लढणार आहोत. लोकांच्या बळावर आम्ही ही निवडणूक लढणार आहोत. उद्या मी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे. '

तसंच, 'उमेदवारी अर्ज दाखल करताना प्रदेशाध्यक्ष सपकाळ, महादेव जाणकर, जिल्हाध्यक्ष आणि अनेक प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत. २०१४ साली मी निवडणूक लढवली होती. अजित पवार आणि आमचे मतभेद होते पण आमचे मनभेद नव्हते. आम्ही अनेक मुद्दे उपस्थित केले. अतिशय मुद्देसुदपद्धतीने आम्ही निवडणुकीला सामोरे गेलो होतो. बारामतीमधील महागाई, गॅस दरवाढ, शेतकऱ्यांची कर्माफी, शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळत नसेल, पाण्याचे प्रश्न असे अनेक विषय घेऊन आम्ही लोकांपुढे जाणार आहोत.', असे आकाश मोरे यांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJP ला झटका; शिवाजी पार्कवरच्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी परवानगी नाकारली

IND vs WI 1st ODI: विराट कोहलीची शतकीय खेळी; ८ गडी राखून भारताचा वेस्ट इंडिजवर शानदार विजय

किंग कोहलीने इतिहास रचला; ‘विराट’ षटकारासह ‘रन मशिनचे ५५ वे शतक, सचिन तेंडुलकरचे दोन मोठे विक्रम

Maharashtra News Live Update: भामरागडमधून दिलासादायक बातमी; पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले

साधेपणाने लग्न केलेल्यांना मुलं झाली नाहीत का? दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर विखेंचं अजब विधान

SCROLL FOR NEXT