AI in agriculture India  Saam tv
महाराष्ट्र

Artificial intelligence in farming : शेतीत पहिल्यांदाच AI चा वापर होणार; जगातील पहिलाच प्रयोग महाराष्ट्रातील बारामतीत

AI in agriculture India : राज्यातील शेतीत पहिल्यांदाच AI चा वापर होणार आहे. राज्यातील पहिलाच प्रयोग हा महाराष्ट्रातील बारामतीत होणार आहे. याविषयी ज्येष्ठ उद्योजक प्रतापराव पवार यांनी माहिती दिली.

Vishal Gangurde

नितीन पाटणकर, साम टीव्ही

पुणे : शेतीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर, अर्थात एआय इन अॅग्रीकल्चर हा प्रयोग बारामतीमध्ये राबवला जात आहे. भारतातीलच नव्हे तर जगातील अशा प्रकारचा हा पहिलाच प्रयोग आहे. या प्रयोगाची दखल मायक्रोसॉफ्ट कंपनीचे प्रमुख सत्या नाडेला यांनी घेतलेली आहे. ज्येष्ठ उद्योजक प्रतापराव पवार हे एआय इन अॅग्रीकल्चर या प्रकल्पाचे प्रणेते आहेत. शेती आणि कृत्रिम बुद्धिमता (एआय) याच विषयावर प्रतापराव पवार यांनी भाष्य केलं.

शेती आणि कृत्रिम बुद्धिमता यावर भाष्य करताना ज्येष्ठ उद्योजक प्रतापराव पवार म्हणाले, 'सत्या नाडेला यांनी मायक्रोसॉफ्टची माणसं बारामतीत प्रयोग सुरू असलेल्या कृषी विज्ञान केंद्रात पाठवली आहेत. त्याचबरोबर प्रत्यक्ष शेतकऱ्यांकडे देखील त्यांच्या लोकांनी भेट दिली. त्यानंतर त्यांनी या प्रयोगाची दखल घेतलेली आहे. त्यामुळे देशासाठी, शेतकऱ्यांसाठी, बारामतीसाठी हा मोठा आनंदाचा आणि विजयाचा दिवस आहे. सत्या नाडेला यांच्यामुळे यात काम करणाऱ्यांचा उत्साह वाढणार आहे. त्यांना प्रेरणा मिळणार आहे'.

'शेतीतील हरितक्रांती, श्वेत क्रांती यांच्यानंतर ही आता तिसरी क्रांती असणार आहे. ती एआय क्रांती असेल. एआय म्हणजे सीएनसी मशीनसारखे आहे. एकदा ते सेट केले की, तुम्हाला काही करावे लागत नाही. ते मशीनच सर्व काही करत असते. गरीब आणि सामान्य शेतकऱ्याला परवडणारे हे तंत्रज्ञान आहे, ही यातील सर्वात महत्त्वाची बाब आहे. यात जास्त शेती असावी, जास्त पाणी असावं, जास्त पैसे असावेत अशी कोणतीही अट नाही, असे पवार यांनी सांगितले.

'शेतीतील एआय तंत्रज्ञान म्हणजे बहुगुणी आखूडशिंगी गाय आहे. सध्या दीडशे शेतकऱ्यांच्या दीडशे एकर क्षेत्रावर एआय तंत्रज्ञानातून ऊस लागवडीचा प्रयोग राबवण्यात आलेला आहे. त्याचे रिझल्ट आश्चर्यकारक आहेत. सरकारला जर या प्रयोगात सहभाग घ्यायचा असेल तर सरकारने गावागावात वेधशाळा उभारून द्यावी त्याचा शेतकऱ्यांना मोठा फायदा होईल. राज्यात ऊस पिकाखालील क्षेत्र सर्वाधिक आहे. त्यामुळे सध्या या प्रयोगासाठी ऊस पिकाची निवड केली आहे. एआयइन अॅग्रीकल्चर आपल्या शेतात राबवण्यासाठी पुढील वर्षीसाठी दहा हजार शेतकरी तयार आहेत, असे प्रतापराव पवार यांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: सोलापुरात नोकरी न मिळाल्याने शेतकऱ्याची आत्महत्या

Sushil Kedia: मराठी भाषेवरून व्यावसायिकानं राज ठाकरेंना डिवचलं; ५ तारखेनंतर करेक्ट कार्यक्रम करणार, मनसे नेत्याचं प्रत्युत्तर

Ind vs Eng : बेन स्टोक्ससोबत भरमैदानात बाचाबाची; रविंद्र जडेजानं सांगितलं नेमकं कारण

Ashadhi Ekadashi Upvas: आषाढी एकादशीला जास्त मेहनत न घेता घरीच बनवा हे ६ सोपे पदार्थ

Hruta Durgule : महाराष्ट्राची क्रश हृता दुर्गुळे सध्या काय करते ?

SCROLL FOR NEXT