Anant Chaturdashi 2026 saam tv
महाराष्ट्र

Anant Chaturdashi 2026: मुंबई-पुण्यात बाप्पाला निरोप; विसर्जन मिरवणुकांना सुरुवात, भक्तांची अलोट गर्दी

Ganesh Visarjan 2026: अनंत चतुर्दशीनिमित्त मुंबई आणि पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकांना सुरुवात झाली आहे. लालबाग, गणेशगल्ली, परळ आणि इतर प्रसिद्ध गणपतींच्या मिरवणुका वाजत-गाजत निघाल्या असून गिरगाव चौपाटी आणि पुण्यात भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे.

Surabhi Jayashree Jagdish

आज अनंत चतुर्दशी असून गेले बारा दिवस मनापासून बाप्पाची पूजा आणि सेवा केल्यानंतर आज लाडक्या गणरायाला निरोप दिला जाणार आहे. त्यामुळे भक्तांच्या मनात एकीकडे उत्साह तर दुसरीकडे बाप्पाला निरोप देताना डोळ्यांत अश्रू असं भावनिक वातावरण पाहायला मिळतंय. मुंबईसह देशभरात आज गणेश विसर्जनाच्या मिरवणुका मोठ्या उत्साहात निघणार आहेत.

मुंबईतही विविध गणेश मंडळांच्या विसर्जन मिरवणुका वाजत-गाजत गिरगाव चौपाटीच्या दिशेने रवाना होणार आहेत. मुंबईचा राजा गणेशगल्ली, लालबागचा राजा, परळचा राजा, प्रगती क्रीडा मंडळ, राजा तेजुकायाचा, रंगारी बदक चाळ, काळाचौकीचा महागणपती आणि चिंचपोकळीचा चिंतामणी या प्रसिद्ध गणपती मंडळांच्या मिरवणुका आहेत.

लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी लालबाग नगरी भक्तांनी फुलून गेली आहे. सकाळपासूनच लालबाग परिसरात भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे.

लालबागचा तेजुकायाचा विसर्जनासाठी मार्गस्थ

लालबागमधील प्रसिद्ध गणपती मंडळ असलेल्या ‘राजा तेजुकायाचा’ची विसर्जन मिरवणूक सुरू झाली आहे. देखण्या गणरायाचं रूप भाविकांचं लक्ष वेधून घेतंय. या गणपतीची खासियत म्हणजे संपूर्ण मूर्ती कागदाच्या लगद्यापासून तयार करण्यात आली आहे. राजा तेजुकायाचाच्या विसर्जन मिरवणुकीसाठी लालबाग परिसरात मोठ्या संख्येने भाविक जमलेत. बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी आणि त्याला निरोप देण्यासाठी परिसरात भक्तांची अलोट गर्दी पाहायला मिळत आहे.

मुंबईच्या राजाच्या स्वागतासाठी गणेशगल्ली सजली

मुंबईचा राजा गणेशगल्लीच्या विसर्जन मिरवणुकीआधीची आरती संपन्न झाली आहे. आता मुंबईचा राजा विसर्जनासाठी मार्गस्थ होतेय. गणेशगल्ली परिसरातील रस्त्यांवर मुंबईच्या राजाच्या स्वागतासाठी आकर्षक रांगोळ्या काढण्यात आल्या आहेत. गणेशगल्ली परिसरात चार ते पाच ठिकाणी वेगवेगळ्या बाबींवर रांगोळ्या साकारण्यात आल्या आहेत. कलाकारांकडून या रांगोळ्या तयार करण्यात आल्या आहेत.

गिरगाव चौपाटी विसर्जनासाठी सज्ज

मुंबईतील प्रमुख विसर्जन स्थळांपैकी एक असलेली गिरगाव चौपाटीही गणेश विसर्जनासाठी सज्ज झाली आहे. दरवर्षी हजारोंच्या संख्येने सार्वजनिक गणेश मंडळांच्या गणेशमूर्तींचं विसर्जन गिरगाव चौपाटीवर केलं जातं. बाप्पाला निरोप देण्यासाठी गिरगाव चौपाटीवर येणाऱ्या गणेशभक्तांची संख्याही लाखोंच्या घरात असतं. त्यामुळे यंदाही विसर्जन सोहळ्यासाठी येथे मोठी तयारी करण्यात आली आहे.

परळचा राजा विसर्जनासाठी मार्गस्थ

परळचा राजा अर्थात नरेपार्कचा गणपतीही विसर्जनासाठी मार्गस्थ झाला आहे. गणरायाच्या देखण्या रूपाने भाविकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. विठुरायावर जीव ओवाळून टाकणाऱ्या वारकऱ्याच्या रूपातील बाप्पाची मूर्ती भाविकांच्या मनात घर करतंय. या सुंदर रूपाचं दर्शन घेण्यासाठी आणि ते डोळ्यांत साठवून ठेवण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली आहे.

परळचा राजा मंडपातून लालबागच्या दिशेने मार्गस्थ झाला आहे. बाप्पाच्या दर्शनासाठी आणि त्याला निरोप देण्यासाठी परिसरात भाविकांची तुडुंब गर्दी पाहायला मिळत आहे.

पुण्यात गणपती विसर्जन मिरवणूकीला सुरुवात

पुण्यातील मानाचा पहिला श्री कसबा गणपती पालखीत विराजमान झाला असून विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली आहे. मिरवणुकीपूर्वी कसबा गणपतीची विधिवत आरती संपन्न झाली. त्यानंतर पारंपरिक पद्धतीने गणरायाला पालखीत विराजमान करण्यात आलं. ढोल-ताशांचा गजर आणि गणरायाच्या जयघोषात कसबा गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीला प्रारंभ झाला. गणरायाच्या दर्शनासाठी आणि मिरवणूक पाहण्यासाठी मोठ्या संख्येने भाविकांनी मध्यवर्ती पुण्यात गर्दी केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: अन्न व औषध प्रशासनाची सप्टेंबर २०२६ अखेरची राज्यव्यापी कारवाई; तुकाराम मुंढे यांची माहिती

घर नवऱ्याच्या नावावर, तरीही त्यालाच घराबाहेर काढलं! बायकोने जिंकली केस; कोर्टाचा निर्णय नेमका काय?

MPSC पेपरफुटी प्रकरणात मोठी कारवाई, आदर्श शिक्षक पुरस्कार विजेता मयूर ठाकरेला अटक

Maharashtra : ऐन दिवाळीत एसटी कर्मचारी संपावर जाणार! ६ नोव्हेंबरपासून आंदोलनाचा इशारा

Supreme Court : रील करणारे कोण, पत्रकार कोण हेच समजत नाही; सरकारचं सुप्रीम कोर्टात उत्तर

SCROLL FOR NEXT