banner war between bjp and shivsena over water issue in aurangabad Saam Tv
महाराष्ट्र

औरंगाबादेत पाण्यावरून राजकारण तापलं; भाजप-शिवसेनेत रंगलं 'बॅनर युद्ध'

औरंगाबाद शहरात गेल्या काही दिवसांपासून पाण्यावरून राजकारण चांगलंच तापलं आहे.

साम टिव्ही ब्युरो

औरंगाबाद : औरंगाबाद (Aurangabad) शहरात गेल्या काही दिवसांपासून पाण्यावरून राजकारण चांगलंच तापलं आहे. शहरात पाणीप्रश्नावरून शिवसेना, भाजप, मनसे या पक्षांनी उडी घेतली आहे. पाणी प्रश्नावरून राजकीय नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत असाताना पाण्यावरून शिवसेना-भाजपमध्ये बॅनरबाजीला सुरुवात झाली आहे. शहरात पाणीप्रश्नावरून बॅनर लावत आरोप-प्रत्यारोप करण्यात येत आहेत. त्यात उद्या औरंगाबाद शहरात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपचा ( BJP ) मोर्चा आहे. त्यानिमित्त लावण्यात आलेल्या बॅनरची संपूर्ण शहरात चर्चा सुरू झाली आहे. त्यानंतर या बॅनरच्या बाजूला शिवसेनेनं (Shivsena ) बॅनर लावून प्रत्युत्तर दिलं आहे. या बॅनर युद्धामुळं राजकीय चर्चांना उधाण आले आहे. (Aurangabad Latest News In Marathi )

हे देखील पाहा -

औरंगाबादेत पाणीप्रश्न चांगलाच पेटत आहे. मनसेनं देखील काही दिवसांपूर्वी पाणीप्रश्नावरून आंदोलन केलं होतं. याच पाणीप्रश्नावरून भाजपनंही भूमिका घेत जल आक्रोश मोर्चाचं आयोजन केलं आहे. शहरातील खडकेश्वर मंदिराच्या समोर भाजपने जल आक्रोश मोर्च्याचा माहितीचा बॅनर लावला आहे. या मोर्चाचे नेतृत्व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस करणार आहेत. येत्या सोमवारी ४ वाजता हा मोर्चा असणार आहे, या आशयाचा बॅनर भाजपकडून लावण्यात आला आहे. भाजपच्या या बॅनरला शिवसेनेनं प्रत्युत्तर दिलं आहे. 'आम्ही पाणीपट्टी पन्नास टक्क्यांवर आणली आहे. तुम्ही गॅसचे भाव अर्ध्यांवर आणणार का ?, अशा आशयाचा शिवसेनेनं बॅनर लावत भाजपला प्रत्युत्तर दिलं आहे. त्यामुळं शहरात बॅनरबाजीची चांगलीच चर्चा सुरू आहे. यावरून भाजप-शिवसेनेमध्ये बॅनरयुद्ध सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे.

दरम्यान, एमआयएम पक्षाचे नेते, खासदार इम्तियाज जलील यांनी पाणीप्रश्नावरून भाजप-शिवसेना नेत्यांवर जोरदार टीका केली होती. त्यांनी फक्त निवडणुका आल्या की पाण्याची, संभाजीनगर, औरंगजेबाची आठवण यांना कशी येते, अस सवाल करत त्यांनी दोन्ही पक्षांना टोला लगावला होता. जलील यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावरही जोरदार निशाणा साधला होता. 'तुम्ही इतके वर्ष शिवसेनेसोबत महापालिकेत सत्तेत होता. तेव्हा तुम्ही काय केले ? फडणवीस देखील हंडा मोर्चा काढणार आहेत, त्यांच्या पक्ष देखील शिवसेनेसोबत सत्तेत होता, त्यांचाही महापौर होता, तेव्हा फडणवीसांनी काय केलं ?, असा सवाल करत खासदार जलील यांनी फडणवीसांवर टीका केली होती. आता देवेंद्र फडणवीस येत्या सोमवारी शिवसेना आणि खासदार जलील यांच्या आरोपावर काय बोलणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.

Edited By - Vishal Gangurde

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sulakshana Pandit Death: बॉलिवूडच्या प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्रीचं निधन, चित्रपटसृष्टीवर शोककळा

हे तुम्हाला दाखवण्यासाठीच...; मुलीच्या महागड्या साखरपुड्यावरून टीकाकारांना कीर्तनकार इंदोरीकर महाराजांचं उत्तर

Mumbai Local Train: मध्य रेल्वे मार्गावरील अपघात नेमका कसा घडला? मृतांची नावे आली समोर, रेल्वे प्रशासनानं दिली माहिती

नातवासमोरच आजीला लाच घेताना अटक; लाचखोर महिलेच्या डोळ्यातून अश्रू, पोलीस अधीक्षक कार्यालयात नेमकं काय घडलं?

गंभीर गुन्हे दाखल असले तरी निवडणूक लढता येते का? कायदा काय म्हणतो?

SCROLL FOR NEXT