बँका पिक कर्ज देत नाही म्हणून शेकऱ्याने बॅंकेसमोरच फोडलं डोकं Saam TV
महाराष्ट्र

बँका पिक कर्ज देत नाही म्हणून शेकऱ्याने बॅंकेसमोरच फोडलं डोकं

खरीप हंगाम अर्ध्यावर आल्यानंतरही बँका पिक कर्ज देत नाहीत म्हणून औरंगाबाद जिल्ह्यात एका शेतकऱ्याने बँकेचे समोरच डोके फोडून घेण्याचा प्रयत्न केला.

डॉ. माधव सावरगावे

औरंगाबाद: खरीप हंगाम अर्ध्यावर आल्यानंतरही बँका पिक कर्ज देत नाहीत म्हणून औरंगाबाद जिल्ह्यात एका शेतकऱ्याने बँकेचे समोरच डोके फोडून घेण्याचा प्रयत्न केला. यात तो जखमी झाला. तिथं असलेल्या पोलिसांनी तातडीने त्या शेतकऱ्याला ताब्यात घेतले. फुलंब्री तालुक्यातील वडोद बाजार येथील बँक ऑफ महाराष्ट्र बँकेच्या शाळेसमोर प्रहार संघटनेचे कार्यकर्ते शेतकरी मंगेश साबळे यांनी दगडाने डोके फोडत ढोल वाजवत आंदोलन केले. औरंगाबाद जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यातील वडोद बाजार येथील बँक ऑफ महाराष्ट्र शाखेत मागील गेल्या जून महिन्यापासून शेतकऱ्यांनी पिककर्जाची संचिका दाखल केलेल्या आहे.

मात्र बँक ऑफ महाराष्ट्र शाखेचे व्यवस्थापक व कर्मचारी शेतकऱ्यांना वारंवार हेलपाटे मारायला लावत आहे. बँकेमध्ये पीककर्जच्या संचिका शेतकऱ्यांनी संपूर्ण कागदपत्रे देऊन दाखल केलेल्या आहे. परंतु बँकेतील अधिकारी कर्मचारी वारंवार एकच कागदपत्रे पुन्हा-पुन्हा मागत असल्याने शेतकरी त्रस्त झाले आहे. त्यात पुन्हा मागील वर्षी अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांची पिके वाया गेली आहे. मात्र मागील चार महिन्यापासून शेतकरी बँकेत पीककर्जासाठी हेलपाटे मारीत आहेत.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पुणे- खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू

Lohagad fort Video : लोहगड किल्ल्यावर पर्यटकांनी केलं धुम्रपान; शिवप्रेमींचा दणका, व्हिडिओ व्हायरल

Abhijeet Dipke Video : पोलीस अधिकाऱ्यांनी आंदोलक मुलींचे कपडे फाडून मारहाण केली; अभिजीत दिपके काय काय म्हणाले?

Accident : लष्करी तळाजवळ भीषण अपघात; मेजरचा जागीच मृत्यू, लेफ्टनंट दर्जाचे २ अधिकारी गंभीर जखमी, नेमकं काय घडलं?

Kidney Damage : सावधान! हाय BP मुळे निकामी होतेय किडनी; ही धोक्याची चिन्हे दुर्लक्षित करू नका

SCROLL FOR NEXT