Beed Accident Saam tv
महाराष्ट्र

बीडमध्ये भीषण अपघात; भरधाव ट्रकच्या धडकेत बँकेच्या अधिकाऱ्याचा जागीच मृत्यू

Beed Accident: बीडमध्ये भीषण अपघात झाला आहे. भरधाव ट्रकच्या धडकेत बँकेच्या अधिकाऱ्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

Vishal Gangurde

बीडमध्ये भीषण अपघाताचा थरार

बीडमध्ये भरधाव ट्रकच्या धडकेत बँकेच्या अधिकाऱ्याचा मृत्यू

सुदर्शन टाक असे अपघातात मृत्यू झालेल्या बँक अधिकाऱ्याचे नाव

योगेश काशिद, साम टीव्ही

बीडच्या अंबाजोगाई शहरात भीषण अपघाताची घटना घडली आहे. अंबाजोगाई शहरात रिंग रोडवरील मानवलोक कार्यालयाजवळ आज बुधवारी सकाळी भीषण अपघातात बँक अधिकाऱ्याचा जागीच मृत्यू झाला. दुचाकीवरून बँकेत जाताना पाठीमागून येणाऱ्या एका भरधाव ट्रकने अधिकाऱ्याला धडक दिली. या धडकेत बँक अधिकाऱ्याच्या मृत्यूने हळहळ व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सुदर्शन टाक असे बँक अधिकाऱ्याचे नाव आहे. सुदर्शन हे सकाळी दुचाकीवरून कामासाठी निघाले होते. तथागत चौकाजवळ पोहोचल्यानंतर रिंग रोडवरून प्रवास करताना एका अनियंत्रित आणि भरधाव ट्रकने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. या भीषण अपघातात गंभीर मार लागल्याने सुदर्शन टाक याचा घटनास्थळी जागीच मृत्यू झाला.

अपघात झाल्याची माहिती मिळताच अंबाजोगाई शहर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी तातडीने घटनेचा पंचनामा केला केला आहे. बँक अधिकाऱ्याचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. या अपघाताचा पोलीस निरीक्षक शरद जोगदंड यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू करण्यात आला आहे.

अपघाताची माहिती मिळताच दीनदयाळ बँकेचे अध्यक्ष अॅड. मकरंद पत्की, इतर संचालक, मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी तातडीने रुग्णालयात आणि घटनास्थळी धाव घेत घटनेची माहिती घेतली. सुदर्शन टाक हे मूळचे उजनी गावचे रहिवासी आहेत. सुदर्शन हे बँक परिवारात त्यांच्या मनमिळाऊ आणि शांत स्वभावासाठी परिचरित होते. त्यांच्या निधनाने दीनदयाळ बँक परिवारासह संपूर्ण शहरात मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे.

त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे. आज बुधवारी सायंकाळी त्यांच्या मूळगावी उजनी येथे त्यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ITR filing: ITR भरण्यासाठी उरले २४ तास; फक्त १० मिनिटांत घरबसल्या रिटर्न भरा, वाचा स्टेप-बाय-स्टेप प्रोसेस

Maharashtra News Live Update: ठाकरेंच्या शिवसेनेचे नगरसेवक महापौरांच्या दालनात शिरले

Railway Accident : नागपुरात भयंकर दुर्घटना! रेल्वे रुळावर २ भावांचे मृतदेह छिन्नविछिन्न अवस्थेत आढळले; नेमके काय घडले?

ठाण्याच्या विकासाला नवी झळाळी! सिद्धेश्वर तलावाजवळील ५० एकरांहून अधिक क्षेत्रात उभारणार ‘ग्रेड A+’ व्यावसायिक प्रकल्प

पंढरपूरच्या वारीवरून परतताना काळाचा घाला! ३ वाहनांचा भीषण अपघात; एका वारकऱ्याचा मृत्यू, ११ गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT