MP Shrirang Barnes letter to Anurag Thakur SAAM TV
महाराष्ट्र

Adipurush Movie Ban: आदिपुरुष चित्रपटावर बंदी घाला! शिवसेना खासदाराचं थेट केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांना पत्र

MP Shrirang Barnes letter to Anurag Thakur: शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे यांनी केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांना पत्र लिहून आदिपुरुष चित्रपटावर बंदी आणण्याची मागणी केली आहे.

साम टिव्ही ब्युरो

Shiv Sena MP Shrirang Barnes letter to Anurag Thakur : आदिपुरुष चित्रपट वादात सापडला आहे. यातील दृश्ये आणि संवादावर प्रेक्षकांडून मोठ्या प्रमाणात टीका केली जात आहे. यात राजकीय पक्ष देखील मागे नाहीत. काँग्रेससह इतर पक्षांनी देखील आदिपुरुष चित्रपटातील दृष्यांवरून निर्मात्यांसह केंद्र सरकारच्या भूमिकेवरही टीका केली आहे.

यात आता शिवसेनेची देखील भर पडली आहे. शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे यांनी केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांना पत्र लिहून आदिपुरुष चित्रपटावर बंदी आणण्याची मागणी केली आहे. आदिपुरुष चित्रपटामुळे भारताची बदनामी होत असल्याचा आरोप बारणे यांनी या पत्रातून केला आहे.

पत्रात नेमकं काय म्हणाले खा. श्रीरंग बारणे?

"श्री अनुराग ठाकुर, माननीय माहिती आणि प्रसारण मंत्री भारत सरकार, महोदय, बॉलीवूड चित्रपट आदिपुरुष हा ओम राऊत यांनी दिग्दर्शित केला आहे. टी-सीरीज फिल्म्स आणि रेट्रोफाईल्स द्वारे निर्मित आहे. हा चित्रपट एकाच वेळी हिंदी आणि तेलुगू भाषांमध्ये शूट करण्यात आला आहे. हा चित्रपट 16 जून 2023 रोजी सर्व चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे.

आदिपुरुष चित्रपटाच्या स्क्रिप्ट आणि व्हिज्युअल्सवर देश-विदेशातून टीका होत आहे. चित्रपटात संशोधनाचा अभाव यासह लेखक, दिग्दर्शक आणि इतर कलाकारांची सदोष विचारसरणी आणि दृष्टी दिसून येते. "आदिपुरुष" चित्रपटातून आपल्या भारतीय संस्कृतीची खिल्ली उडवली आहे. या चित्रपटात राम, माता सीता, हनुमानजी आणि रावण यांच्याशी निगडित आक्षेपार्ह दृश्ये दाखवण्यात आली आहेत. या चित्रपटातून आमच्या हिंदू समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत.

महोदय, जेव्हापासून हा चित्रपट भारतात आणि परदेशात प्रदर्शित झाला आहे, तेव्हापासून हा चित्रपट वादात सापडला आहे. ‘आदिपुरुष’ चित्रपटाला देशभरातून विरोध होत आहे. "आदिपुरुष" या चित्रपटात अनेक अयोग्य आणि असभ्य संवाद वापरण्यात आले आहेत. आपल्या पवित्र ग्रंथ रामायणावर आधारित चित्रपट बनवल्याबद्दल आणि या चित्रपटात अयोग्य आणि असभ्य भाषा वापरल्याबद्दल देशभरातील लोकांमध्ये प्रचंड नाराजी आणि संताप आहे. चित्रपटात भगवान हनुमानाचा अपमान करण्यात आला आहे, चित्रपटात श्री हनुमानाच्या पात्राला अपमानास्पद संवाद देण्यात आले आहेत. (Marathi Tajya Batmya)

चित्रपट निर्मात्यांनी हा चित्रपट रामायणावर आधारित असल्याचे वर्णन केले आहे, परंतु त्यातील एकही पात्र आमच्या धार्मिक ग्रंथांच्या नियमांनुसार नाही. चित्रपटात असभ्य आणि अशोभनीय भाषेचा वापर करण्यात आला आहे. सनातन आस्था आणि सनातनप्रेमींची मने दुखावणारे संवाद या चित्रपटात आहेत. तसेच या चित्रपटात दाखवण्यात आलेली रामायणातील सर्व पात्रे रामायणाच्या कथेच्या पूर्णपणे विरुद्ध आहेत, ज्याने आपल्या धर्मग्रंथांवर आणि आपल्या संस्कृतीवर आघात केला आहे. हा चित्रपट म्हणजे आमचा इतिहास बदलण्याचे षडयंत्र आहे. (Latest Political News)

महोदय, चित्रपट हा समाजाचा आरसा असतो. आपल्या धर्मग्रंथांची कथा पूर्णत: चुकीच्या आणि मर्यादाबाह्यपणे दाखवणारे असे चित्रपट येणाऱ्या पिढीवर आमच्या धर्म आणि संस्कृतीबद्दल पूर्णपणे चुकीचे संस्कार करतील. त्यामुळे या "आदिपुरुष" चित्रपटावर देशव्यापी बंदी घालण्यात यावी आणि चित्रपटाचा निर्माता आणि या चित्रपटाशी संबंधित सर्व कलाकारांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, ही विनंती. धन्यवाद." (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Election Result: देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील, प्रवीण दरेकर यांचं मोठं वक्तव्य

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: मलबार हिलमधून मंगल प्रभात लोढा यांची विजयाकडे वाटचाल

Bribe Case : गुन्हा दाखल न करण्यासाठी ३० हजारांची लाच; राज्य उत्पादन शुल्कचे उपनिरीक्षकासह पंटर ताब्यात

Cardamom Benefits: बहुगुणी वेलचीचे 'हे' फायदे तुम्हाला माहित आहे का?

Jharkhand Election Result: झारखंडमध्ये भाजपला धक्का, इंडिया आघाडीनं बहुमत गाठलं, कुणाला किती जागांवर आघाडी?

SCROLL FOR NEXT