chandrapur, women, police, arrest, ujjain , youth. saam tv
महाराष्ट्र

Crime News : नोकरी लावताे म्हणून नेले अन् तिला पन्नास हजारात विकले

संबंधित महिलेने विरोध केल्यानंतर तिला उज्जैन येथे एका घरात डांबून ठेवण्यात आले.

संजय तुमराम

: चंद्रपूर (chandrpaur) जिल्ह्यातील बल्लारपूर येथील घटस्फोटीत महिलेला (women) उज्जैन येथे विकल्याचा धक्कादायक प्रकार समाेर आला आहे. उज्जैन येथे नोकरी लावून देण्याच्या बहाण्याने या टोळीने घटस्फोटीत महिलेला आपल्यासोबत उज्जैन येथे नेले होते. तेथे तिची विक्री करण्यात आली. या प्रकरणी पाेलिसांनी तिघांना ताब्यात घेतले आहे. (chandrapur latest marathi news)

उज्जैन येथे नोकरी लावण्यासाठी या टोळीने घटस्फोटीत महिलेला आपल्यासोबत उज्जैन येथे नेले होते. तिथे गेल्यावर सध्या भरती नाही असे सांगत एका युवकाशी पन्नास हजार रुपयांत तिचे लग्न लावून देण्यात आले. संबंधित महिलेने विरोध केल्यानंतर तिला उज्जैन येथे एका घरात डांबून ठेवण्यात आले.

त्यानंतर महिलेने बल्लारपुरात आपल्या भावाशी कसाबसा संपर्क केला. भावाच्या तक्रारीनंतर बल्लारपूर पोलिसांनी आरोपींचा माग काढत उज्जैन गाठले. या तपासात चंद्रपूर- विसापूर व बल्लारपूर परिसरात महिला व मुली विकणारी टोळीचा छडा लागला.

उज्जैन येथून आशाबाई वाघमारे आणि स्वप्ना पेंदोर या दोन महिला व घटस्फोटीत महिलेशी लग्न करणारा मदन राठी या युवकाला पोलिसांनी (police) ताब्यात (arrest) घेतले. चंद्रपूर (chandrapur) जिल्ह्यातील इतर काही भागात अशाच प्रकारे मुली विक्रीच्या घटनांशी या टोळीचा संबंध आहे काय, याबाबत पोलीस तपास करत आहेत अशी माहिती उमेश पाटील (पोलिस निरीक्षक, बल्लारपूर) यांनी दिली. (Breaking Marathi News)

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

CJPचा 24 तासांचा अल्टिमेटम तिकडे जंतरमंतरवर आंदोलनांना बंदी, सरकारकडून कोंडी

तुकाराम मुंढे दूर करणार MPSCतील भेसळ; सरकारनं सोपवली मोठी जबाबदारी

बारामती लोकसभेतून 7 लाख मतदार गायब; खासदार सुप्रिया सुळेंच्या दाव्यानं खळबळ

देशात मोठी राजकीय घडामोड! सहा राज्यांचे राज्यपाल बदलले; कोणाची कोणत्या राज्यात झाली नियुक्ती?

ज्ञानेश कुमारांविरोधात राहुल गांधींचं 'शिवतांडव'; सुप्रीम कोर्टात याचिकेसाठी इंडिया आघाडीचा मोर्चा

SCROLL FOR NEXT