baliraja shetkari sanghatana  saam tv
महाराष्ट्र

दूधाच्या दरासाठी बळीराजा आक्रमक; राज्यभर आंदाेलन छेडण्याचा दिला इशारा

आज पंढरपूरात शेतक-यांनी दिला सरकारला इशारा.

भारत नागणे

पंढरपूर : सध्या दूध (milk) उत्पादनाचा शुष्क काळ सुरू आहे. तरीही दुधाचे दर मागील दहा दिवसात प्रती लिटर दोन‌ रूपयांनी‌ कमी झाले आहेत. दुधाचे दर येत्या काळात वाढवले नाहीत तर बळीराजा शेतकरी संघटना (baliraja shetkari sanghatana) राज्यभर (maharashtra) आंदोलन (aandolan) पेटवेल असा इशारा प्रदेशाध्यक्ष नितीन बागल यांनी आज पंढरपुरात (pandharpur) येथे दिला आहे. (milk price latest marathi news)

बळीराजा शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष नितीन बागल म्हणाले खासगी दूध संस्थांनी साखळी करून पशुखाद्याचे दर २५० रुपयांनी वाढवले आहेत. तर दुसरीकडे दूधाचे दर दहा दिवसांमध्ये दोन रुपयांनी कमी केले आहेत. यामुळे दूध उत्पादक शेतकरी अडचणीत सापडले आहेत.

शासनाने गाईच्या दूधाला प्रती लिटर ४० रूपये व म्हशींच्या दूधाचा ५० रूपये भाव द्यावा अन्यथा बळीराजा शेतकरी संघटनेच्या वतीने राज्यभरात आंदोलन केले जाईल असा इशारा देखील नितीन बागल (nitin bagal) यांनी माध्यमांशी बाेलताना दिला.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tuesday Horoscope : खर्च कमी करावा! ७ राशींच्या व्यक्तींना अचानक धनलाभ होण्याची शक्यता; वाचा मंगळवारचे राशीभविष्य

CJPचा 24 तासांचा अल्टिमेटम तिकडे जंतरमंतरवर आंदोलनांना बंदी, सरकारकडून कोंडी

तुकाराम मुंढे दूर करणार MPSCतील भेसळ; सरकारनं सोपवली मोठी जबाबदारी

बारामती लोकसभेतून 7 लाख मतदार गायब; खासदार सुप्रिया सुळेंच्या दाव्यानं खळबळ

देशात मोठी राजकीय घडामोड! सहा राज्यांचे राज्यपाल बदलले; कोणाची कोणत्या राज्यात झाली नियुक्ती?

SCROLL FOR NEXT