balasaheb thackeray speech Saam TV
महाराष्ट्र

Balasaheb Thackeray : विधानभवनाच्या मध्यभागी लागणार बाळासाहेबांचं तैलचित्र; विधानसभेत प्रस्ताव पारित

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल शेवाळे यांच्याकडे मागणी केली होती.

साम टिव्ही ब्युरो

Balasaheb Thackeray Painting : नागपूर येथे विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनातून एक मोठी बातमी समोर आली आहे. विधानभवनात हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं तैलचित्र लावलं जाणार आहे. याबाबतचा प्रस्ताव देखील सरकारकडून विभानसभेत पारित करण्यात आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल शेवाळे यांच्याकडे मागणी केली होती. ती आज मान्य करण्यात आली आहे. (Maharashtra Political News)

विधानभवनाच्या मध्यमभागी हे तैलचित्र लावलं जाणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सत्तेची सूत्रे हाती घेतल्यानंतर ही मंजुरी मिळवली आहे. जवळपास ४० हून अधिक आमदारांसह शिवसेनेतून बंड (शिंदेंच्या शब्दात उठाव) कर गुवाहाटी गाठली होती.

त्यांना १० हून अधिक अपक्ष आमदारांची साथ लाभल्याने राज्यातील महाविकासआघाडी सरकार कोसळलं. त्यानंतर शिंदे यांनी भाजपासोबत हातमिळवणी करून राज्यात शिंदे-भाजप सरकार स्थापन झाले. आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एका पाठोपाठ एक निर्णयांचा धडाकाच लावला आहे.

दरम्यान, उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री असताना, त्यांना याबाबतचा निर्णय घेता आला नव्हता. मात्र बाळासाहेबांच्या विचारांचा वारसा आपल्याकडे असल्याचा दावा करणार्‍या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानभवनात मध्यभागी बाळासाहेब ठाकरे यांचे तैलचित्र लावण्याचा निर्णय घेतला आहे. त्याला विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी हिरवा कंदीलही दाखवला आहे. त्यामुळे लवकरच विधानभवनात बाळासाहेबांचं तैलचित्र दिसेल.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Guruwar che Upay: प्रत्येक कामात फक्त मिळणार यश; गुरुवारच्या दिवशी भगवान विष्णूंचे हे उपाय करा

महिन्याला फक्त ₹१००० ची SIP करा अन् १० लाख रूपये मिळवा, वाचा गुतंवणुकीचे A टू Z कॅल्क्युलेशन

Shilpa Shetty : शिल्पा शेट्टीचं चाहत्यांना चॅलेंज, वर्कआऊटचा VIDEO केला शेअर

Google Pixel 10 Pro Fold 5G भारतात लाँच, काय आहेत दमदार फिचर्स आणि किंमत? वाचा सविस्तर

Maharashtra Live News Update : पुण्यातील भिडे पूल पाण्याखाली, पावासाचा हाहाकार

SCROLL FOR NEXT