balasaheb thackeray jayanti 2024 hindutva rally in maharashtra saam tv
महाराष्ट्र

Balasaheb Thackeray Jayanti 2024 : वाशिममध्ये 'हिंदूत्व’ मोटरसायकल रॅली, कल्याणच्या भगवा तलाव परिसरात शिवसैनिकांकडून बाळासाहेब ठाकरेंना अभिवादन

यंदाही बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाला आदरांजली वाहण्यासाठी शेकडो शिवसैनिक जमले होते.

Siddharth Latkar

- मनोज जयस्वाल / अभिजीत देशमुख

Balasaheb Thackeray Jayanti 2024 :

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त आज (मंगळवार) राज्यभरात विविध कार्यक्रमांचे आयाेजन करण्यात आले आहे. वाशिम (washim) येथे 'हिंदूत्व’ मोटरसायकल रॅली, कल्याण डोंबिवली (kalyan dombivli) कलाकार त्यांची कला सादर करीत आहेत तर छत्रपती संभाजीनगर (chhatrapati sambhajinagar) येथे बाळासाहेब ठाकरेंच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले. (Maharashtra News)

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त वाशिम शहरात उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने 'हिंदूत्व’ मोटरसायकल रॅली काढण्यात आली. या रॅलीस वाशिम शहरातील सिव्हिल लाईन येथून प्रारंभ झाला.

शहरातील मुख्य चौकातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक मार्गे जिजाऊ निवास्थान येथे रॅलीचा समारोप झाला. या रॅलीमध्ये जिल्ह्यातील शिवसैनिक, आजी-माजी पदाधिकारी यांच्यासह वाशिम तालुका पदाधिकारी, शहर पदाधिकारी, युवा सेनेचे पदाधिकारी सहभागी झाले होते.

कल्याणमध्ये बाळासाहेब ठाकरेंची जयंती साजरी

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती आज कल्याण मध्ये मोठ्या उत्साहात साजरी झाली. कल्याण पश्चिम येथील भगवा तलाव परिसरात सालाबाद प्रमाणे यंदाही बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाला आदरांजली वाहण्यासाठी शेकडो शिवसैनिक जमले होते.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

स्मारक परिसरात जे जे स्कुल ऑफ आर्ट्सचे कलाकार बाळासाहेब ठाकरे यांचे आकर्षक लाईव्ह पेंटिंग साकारत होते. हे पेंटिंग पाहण्यासाठी शिवसैनिकांसह नागरिकांनी गर्दी केली होती. कल्याण डोंबिवली (kalyan dombivli) महापालिका आयुक्त इंदूराणी जाखड या देखील स्मारकावर अभिवादन करण्यासाठी आल्या होत्या. या ठिकाणी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: 'आता तुम्हाला अखेरची संधी' वादग्रस्त मंत्र्यांवर फडणवीसांची नाराजी

Maharashtra Live News Update: आदिवासी आश्रमशाळेत पाण्याची टाकी कोसळून एका 14 वर्षीय विद्यार्थिनीचा मृत्यू

Horoscope Wednesday : 'या' क्षेत्रात नोकरी करण्याऱ्यांची चांदीच चांदी, काहींच्या कटकटी होतील दूर, वाचा राशीभविष्य

PM Modi: अमेरिकेतून रात्रीच्यावेळी कॉल आला अन्...; PM मोदींनी लोकसभेत सांगितली Operation Sindoor ची कहाणी

Pune ST Bus : एसटी बस कंडक्टरवर जीवघेणा हल्ला, लोखंडी रोडने मारहाणीचा प्रयत्न; पुण्यात भयंकर घडलं

SCROLL FOR NEXT