Amit Shah Saam
महाराष्ट्र

'आपकी बात मान लेंगे', तडीपार अमित शहांची बाळासाहेबांना विनंती, मातोश्रीवर एका फोनमुळे नेमकं काय घडलं?

Sanjay Raut Narkatla Swarg Book: संजय राऊत लिखित "नरकातला स्वर्ग" या पुस्तकातून गृहमंत्री अमित शहा यांना कायदेशीर संकटातून बाहेर काढण्यासाठी बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवारांनी कशी मदत केली? याचा उल्लेख पुस्तकात करण्यात आला आहे.

Bhagyashree Kamble

गृहमंत्री अमित शहा यांना संकटाच्या गर्तेतून वाचवण्यासाठी बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवार यांनी कायद्याच्या चौकटी बाहेर जाऊन मदत केली असल्याचा दावा संजय राऊत लिखीत नरकातला स्वर्ग या पुस्तकातून करण्यात आला आहे. अनेक बाबी उलगडणाऱ्या या पुस्तकात नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना वाचवण्यासाठी बाळासाहेबांनी केलेला एक फोन किती मदतगार ठरला, शरद पवारांनी घेतलेल्या एका भूमिकेमुळे नरेंद्र मोदींची अटक कशी टळली? अशा अनेक बाबी पुस्तकातून मांडण्यात आल्या आहेत.

गोधराकांडानंतर मोदी-शहा संकटात

गुजरातमधील गोधराकांडानंतर मुख्यमंत्री नरेंद्र मोदी आणि तत्कालीन गृह राज्यमंत्री अमित शहा पुरते फसले होते. सीबीआयने विविध चौकशीला सुरूवात केली. तपासानंतर अमित शाह यांना तुरुंगवासाला सामोरे जावे लागले असते. परिस्थिती इतकी गंभीर होती की, तपासाची दिशा थेट मुख्यमंत्री नरेंद्र मोदींकडे वळू लागली होती. मोदींना अटक होण्याची शक्यता निर्माण झाली होती.

शरद पवारांची भूमिका

या सगळ्या पार्श्वभूमीवर एक केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत शरद पवारांनी ठाम भूमिका घेतली. 'लोकशाही मार्गाने निवडून आलेल्या कोणत्याही मुख्यमंत्र्याला तुरुंगात टाकणं योग्य नाही,' असं मत पवारांनी मांडलं. त्यांच्या या भूमिकेला अनेकांनी मूक समर्थन दिलं आणि याच भूमिकेमुळे नरेंद्र मोदी यांची संभाव्य अटक टळल्याचा उल्लेख संजय राऊत यांनी आपल्या पुस्तकात केला आहे.

बाळासाहेब ठाकरे यांचा 'तो' एक फोन

अमित शहा यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्यासमोर आपल्या अडचणी मांडताना सांगितले की, “मी अडचणीत आहे, केस न्यायालयात सुरू आहे, तडीपार आहे...आप बात करेंगे तो न्यायमुर्ती आपकी बात मान लेंगे..तुमचा शब्द ते खाली पडू देणार नाही.' असं अमित शहा बाळासाहेब ठाकरेंना म्हणाले. शहांनी केलेल्या विनंतीनंतर बाळासाहेब ठाकरेंनी तत्कालीन नेते मनोहर जोशी यांच्या फोनवरून संबंधित न्यायमूर्तींशी संपर्क साधला. बोलताना त्यांनी एकच वाक्य ठामपणे सांगितलं, 'तुम्ही कोणत्याही पदावर असलात तरी तुम्ही हिंदू आहात, हे विसरू नका.' बाळासाहेबांच्या एका फोनमुळे अमित शहा यांच्या राजकीय प्रवासातील अडचणी दूर झाल्या, असं पुस्तकात नमूद करण्यात आल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: कोल्हापूर जिल्ह्यातील धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस

Mobile Recharge: सरकार भरणार मोबाईलचं बिल? केंद्र सरकारची मोफत रिचार्ज योजना?

हनी ट्रॅपची इनसाईड स्टोरी, हनी ट्रॅपसाठी महिलेने कसा रचला सापळा?

Kolhapur News: 'महादेवी'साठी ग्रामस्थ आक्रमक, वनतारामध्ये 'महादेवी'ला नेण्यास विरोध

EVM Recounting: 8 महिन्यानंतर खडकवासल्यात फेरमतमोजणी, VVPAT मधील व्होटर स्लिप गहाळ ?

SCROLL FOR NEXT