balasaheb patil saam tv
महाराष्ट्र

Sangli: मराठवाड्यातील ऊस ताेडणीसाठी हार्वेस्टर यंत्रणा : बाळासाहेब पाटील

सांगली येथे व्यापार भूषण पुरस्कारांचे वितरण सहकार मंत्र्यांच्या हस्ते नुकतेच संपन्न झाले. त्यावेळी मंत्री पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला.

विजय पाटील

सांगली : अतिरिक्त उसाचे (sugarcane) काय करायचे हा सरकार (maharashtra Government) पुढे मोठा प्रश्न आहे. राज्यात (maharashtra) सर्वत्रच अतिरिक्त उसाचा प्रश्न गंभीर झालेला आहे. हंगाम संपत आला तरी उसाची तोड अद्याप काही ठिकाणी झालेली नाही. मराठवाड्यात अतिरिक्त ऊसाचा प्रश्न अधिकच बिकट झाला आहे. त्यामुळे सहकार विभागाने यामध्ये आता लक्ष घातले असून मराठवाड्यातील ऊस आता हार्वेस्टर यंत्राच्या (harvester machine) सहाय्याने लवकरच तोडला जाईल असे आश्वासन राज्याचे सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील (balasaheb patil) यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिले. (balasaheb patil latest marathi news)

सांगली येथे व्यापार भूषण पुरस्कारांचे वितरण सहकार मंत्र्यांच्या हस्ते नुकतेच संपन्न झाले. त्यावेळी मंत्री पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले राज्यात काही कारखाने बंद पडल्याने तेथील शेतक-यांच्या ऊसाचा प्रश्न निर्माण झाला हाेता. काही ठिकाणी ताे सुटला आहे. ज्या ठिकाणी ऊसाची ताेड हाेऊ शकलेली नाही तेथे लवकरच हाेईल यासाठी प्रयत्न सुरु आहेत.

दरम्यान महागाईचे कारण सांगत सत्तेवर आलेल्या केंद्र सरकारने (central government) आता महागाईवर बोलायचं बंद केले आहे. सामान्य नागरिक महागाईने हैराण झाला आहे. यात अनावश्यक मुद्दे काढून अस्वस्थता निर्माण करण्याचं काम सुरू आहे. कधी कर्नाटकात हिजाबचा मुद्दा तर महाराष्ट्रात भोंग्याचा मुद्दा काढून भडकलेल्या महागाईकडे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न होत आहे असेही मंत्री पाटील यांनी नमूद केले.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

Alu Vadi Recipe: रोज मुलांना डब्यात काय द्यायचं? टेन्शन सोडा, बनवा कुरकुरीत आळू वडी; वाचा रेसिपी

Heart attack: हार्ट अटॅकचा धोका वाढवतात या 9 गोष्टी; लक्षणं ओळखून वेळीच उपचार करा

KKK 15 Winner : 'खतरों के खिलाडी १५' च्या ट्रॉफीवर कोणी कोरलं नाव? प्राईज मनीसोबत मिळाली एकापेक्षा एक आकर्षक बक्षिसे

Ujjal Bhuyan : "शरीरातून आत्मा बाहेर काढण्यासारखे..."; SIR मोहिमेवर सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींचे सर्वात मोठे विधान

SCROLL FOR NEXT