अभिमानास्पद! फोर्ब्सच्या यादीत सोलापूरच्या बालाजी अमाईन्सचे नाव Saam Tv
महाराष्ट्र

अभिमानास्पद! फोर्ब्सच्या यादीत सोलापूरच्या बालाजी अमाईन्सचे नाव

देशात 7 व्या नंबरवर बालाजी अमाईन्स रेमडेसिविरचे घटक बनवणारी कंपनी म्हणून नावलौकिक झाली आहे.

विश्वभूषण लिमये

विश्वभूषण लिमये

सोलापूर- काही दिवसांपूर्वी सोलापूरची चादरेचा शर्ट परिधान करून आंतरराष्ट्रीय गायक निक जोनास Nick Jonas ने सोलापुरी चादर जागतिक स्तरावर पोहोचली होती. आता सोलापूरकांची मान अभिमानाने उंचवणारी आणखी एक बातमी आहे. सोलापुरातील प्रसिद्ध केमिकल निर्माण करणारी बालाजी अमाईन्सने Balaji Amines फोर्ब्सच्या यादीत स्थान मिळवल आहे. फोर्ब्सच्या Forbes यादीत स्थान मिळवणारी बालाजी अमाईन्स ही सोलापुरातील पहिलीच कंपनी आहे.

हे देखील पहा-

कोरोना काळात Corona wave रेमडीसीवरसाठी Remdesivir लागणारे घटक तयार करण्यात देशातील आघाडीची कंपनी म्हणून बालाजी अमाईन्सची सर्वत्र चर्चा झाली होती. आता याच कंपनीमुळे प्रत्येक सोलापूरकरांचे मान अभिमानाने उंचावली आहे.

फोर्ब्सने 2021 मधील उत्कृष्ट भारतीय कंपनीची यादी List of best Indian companies जाहीर केली आहे. ज्यात भारतातील 26 नामांकित कंपन्या आहेत. यामध्ये सोलापुरातील बालाजी अमाईन्सचा देखील समावेश आहे. विशेष म्हणजे या यादीत 7 व्या क्रमांकावर बालाजी अमाईन्स आहे.

फोर्ब्सने जाहीर केलेल्या यादीतील कंपन्याची उलाढाल ही बिलियनच्या Billion आत आहे. 7 व्या क्रमांकावर असलेल्या बालाजी अमाईन्सची वार्षिक उलाढाल ही तब्बल 1448 मिलियन डॉलर अर्थात 10 हजार 652 कोटी इतकी आहे.

कोरोना विरोधात लढताना जगभरात औषधांची प्रचंड मागणी वाढली. त्यामुळे औषध निर्मिती कंपन्या आणि त्यांचे पुरवठादार आले घटक तेजीत होते. शेअर बाजारात काही महिन्यांपूर्वी 700 रुपये शेअर असलेल्या बालाजी अमाईन्सचे शेअर 5 हजार रुपयांपर्यंत गेले होते. त्यामुळे या कंपनीने अनेकांना कोरोना काळात लखपती केले आहे. कोरोनामुळे झालेल्या नुकसानीची बरीच चर्चा झाली. मात्र या नकारात्मक वातावरणात बालाजी अमाईन्सचे नाव फोर्ब्सच्या यादीत असणे हे सोलापूरकरसाठी भूषणावह आहे.

Edited By-Sanika Gade

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: राज्यात शंभर टक्के पीक पाहणी होणार, सर्व जिल्हाधिकाऱ्यांना आदेश

Mhada Home: म्हाडाचे घर असणाऱ्यांसाठी मोठी बातमी! सरकार महत्त्वाचा निर्णय घेण्याच्या तयारीत | VIDEO

ST Bus : पुणे-मुंबई प्रवास महागला, एसटीच्या तिकिटात वाढ, पाहा कोणत्या शहराला जायला किती तिकिट? |VIDEO

Kendra Yog 2025: उद्या म्हणजेच दसऱ्याला 'या' राशींना मिळणार नशीबाची साथ; गुरु-बुध बनवणार पॉवरफुल योग

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींमुळे ३६१ आमदारांचा निधी रखडला; सरकारी तिजोरीवर ताण; VIDEO

SCROLL FOR NEXT