Bakri Eid: घरीच नमाज अदा करीत बकरी ईद साजरी
Bakri Eid: घरीच नमाज अदा करीत बकरी ईद साजरी अरुण जोशी
महाराष्ट्र

Bakri Eid: घरीच नमाज अदा करीत बकरी ईद साजरी

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अरुण जोशी

अमरावती - गेल्या दीड वर्षांपासून कोरोना Corona महामारी संक्रमणामुळे सणासुदीवर पाणी फेरले गेले आहे. असे असले तरी सर्व नियम पाळत आज बकरी ईद Bakri Eid मुस्लिम बांधवानी घरीच नमाज अदा करीत साजरी केली. यावेळी राज्यावर आलेले कोरोना संक्रमण दूर होऊ दे अशी प्रार्थना बच्चे कंपनीने केली आहे.

हे देखील पहा -

नियमांचे पालन करण्याचे आवाहन प्रशासना सोबत प्रतिष्ठित समाज बांधवानी केले होते. त्याच अनुषंगाने आज सकाळी मुस्लिम बांधवांनी घरीच ईदची नमाज अदा केली व एकमेकांना शुभेच्छा दिल्या. ज्या ठिकाणी दरवर्षी नमाज अदा केल्या जाते त्या ठिकाणी आज सर्वत्र शुकशुकाट दिसून आला तर गेल्या दिड वर्षातील ही बकरी ईदची दुसरी नमाज मुस्लिम बांधवांनी घरीच अदा केली आहे.

उत्साहाच्या पर्वावर शहरामध्ये कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी शहरासह - जिल्ह्यात सर्वीकडे कडक बंदोबस्त लावण्यात आला आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत १७४५ पेक्षा अधिक पोलिस कर्मचारी सध्या रस्त्यावर आहेत. या शिवाय मस्जिदच्या परिसरामध्ये विशेष पोलीस बंदोबस्त सुद्धा लावण्यात आला आहे. नियमाचे पालन करून सण साजरा व्हावा, असे आवाहन सुद्धा मुस्लिम संघटनांनी केले आहे.

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jalgaon Crime : सोशल मिडियावर ओळख; लग्नाचे आमिष देत विवाहितेवर अत्याचार

Today's Marathi News Live : अजिंठा घाटात बस पलटी, सहा जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती

Priyanka Gandhi: राहुल गांधी पुन्हा 2 जागांवर निवडणुकीच्या रिंगणात, प्रियंका गांधींसाठी काँग्रेसचा प्लॅन काय? बड्या नेत्याने दिली माहिती

Amruta Kulkarni: अमृताचे गाजलेले चित्रपट माहितीये आहेत का?

Jalgaon News : शरद पवार यांच्या ताफ्यातील वाहनांचा अपघात

SCROLL FOR NEXT