95वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी भारत सासणे डॉ. माधव सावरगावे
महाराष्ट्र

95वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी भारत सासणे

डॉ. माधव सावरगावे

लातूर - या वर्षात होणाऱ्या ९५ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी प्रसिद्ध कथाकार भारत सासणे यांची घोषणा करण्यात आली आहे. २०२२ या वर्षांमध्ये होणाऱ्या ९५ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या नियोजनाला नव्या वर्षाच्या दुसऱ्याच दिवशी सुरुवात झाली. आज लातूर जिल्ह्यातील उदगीर येथील महाराष्ट्र उदयगिरी अखिल भारतीय साहित्य महामंडळाची बैठक झाली. या बैठकीमध्ये अखिल भारतीय साहित्य महामंडळाच्या सर्व सदस्याच्या उपस्थितीत साहित्यिक प्रसिद्ध कथाकार भारत सासणे यांची निवड करण्यात आली आहे.

नाशिकमधील लोकहितवादी मंडळ आणि अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाकडून ९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे कोरोना सावटाखाली पार पडले. संमेलनाची घोषणा झाल्यापासून ते संमेलन पूर्ण होईपर्यंत कोरोनाने काही संमेलनाचा पिच्छा सोडला नाही. आता पुन्हा नव्या ओमायक्रॉनचं सावट आहे. हा विचार करून अखिल भारतीय साहित्य महामंडळाच्या वतीने २०२२ या वर्षात घेण्यात येणारे ९५ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या नियोजनाला आताच सुरू करण्यात आले आहे. या वर्षीचे संमेलन हे मराठवाड्यातील लातूर जिल्ह्यातील उदगीर येथे होणार आहे.

हे देखील पहा -

महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या महाराष्ट्र उदयागिरी महाविद्यालयाने संमेलन घेण्याची तयारी सुरू केलीय. आज उदगीरमध्ये साहित्य महामंडळाच्या पदाधिकार्‍यांची बैठक पार पडली आहे. या बैठकीत साहित्य संमेलनाचे अध्यक्ष निवड घोषित करण्यात आली. शिवाय साहित्य संमेलनाच्या कोरोना काळातील आयोजनाबाबत सखोल चर्चा केली गेली. लवकर नियोजन केले तर ज्या काळामध्ये कोरोना रुग्णांची संख्या कमी असेल किंवा कोरोनाचा प्रभाव नसेल त्या काळात संमेलन घेण्याचा विचार आहे.

उदगीर येथे होणाऱ्या ९५ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड केली जाणार यावर सध्या चर्चा सुरू होती. त्यासाठी ज्येष्ठ साहित्यिक अनिल अवचट, डॉ. रामचंद्र देखणे, प्रसिद्ध कथाकार भारत सासणे, प्रवीण दवणे, अच्युत गोडबोले यांच्या नावाची चर्चा होती. सध्या अखिल भारतीय साहित्य महामंडळाचे कार्यालय हे मराठवाड्यात औरंगाबादेत आहे.

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Wheat Bugs : गव्हासह डब्ब्यात 'या' गोष्टी मिक्स केल्यास लागणार नाहीत किडे

PM Narendra Modi : मोदींचा महाराष्ट्र दौरा; वर्ध्यातून संबोधित करणार

Supreme Court: सर्वात मोठी बातमी! सुप्रीम कोर्टाचं अधिकृत यूट्यूब चॅनल हॅक

Maharashtra News Live Updates: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातील वाद चव्हाट्यावर

Kili Paul Dance : किली पॉलने भोजपुरी गाण्यावर धरला ठेका, 'लॉलीपाप लागेलू'वर जबरदस्त डान्स; हुकस्टेपने वेधलं लक्ष

SCROLL FOR NEXT