Badlapur chemical companies pollution Saam Tv News
महाराष्ट्र

Badlapur MIDC : बदलापूरच्या प्रदूषणकारी कंपन्यांना राज्य सरकारचा दणका, मंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या...

Badlapur Kharwai MIDC : बदलापूरच्या खरवई परिसरात रासायनिक एमआयडीसी असून या एमआयडीसीतील रासायनिक कंपन्या अनेकदा रासायनिक वायू हवेत उत्सर्जित करत असतात.

Prashant Patil

ठाणे : बदलापूर शहरात रासायनिक प्रदूषण करणाऱ्या कंपन्यांना राज्य सरकारने दणका दिला आहे. आतापर्यंत २४ प्रदूषणकारी कंपन्यांवर कारवाई करण्यात आल्याची माहिती पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी विधान परिषदेत दिलीय. कोकण शिक्षक मतदारसंघाचे आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात याबाबतचा तारांकित प्रश्न विचारला होता.

बदलापूरच्या खरवई परिसरात रासायनिक एमआयडीसी असून या एमआयडीसीतील रासायनिक कंपन्या अनेकदा रासायनिक वायू हवेत उत्सर्जित करत असतात. हा रासायनिक वायू वातावरणात पसरत असल्यामुळे बदलापूरकरांना नेहमीच त्रास सहन करावा लागत होता. या कंपन्यांवर कारवाईची मागणी करणारा तारांकित प्रश्न आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी विचारला होता.

त्याला उत्तर देताना आत्तापर्यंत बदलापूर एमआयडीसीतील एकूण २४ कंपन्यांवर कारवाई करण्यात आल्याची माहिती पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी दिली आहे. यापैकी ५ कंपन्यांवर उत्पादन बंद करण्याची कारवाई करण्यात आली असून ५ कंपन्यांना अंतरिम आदेश, ५ कंपन्यांना प्रस्तावित आदेश आणि ९ कंपन्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं आहे. याशिवाय रिलायबल गॅल्वनायझर अँड फास्टनर या कंपनीने हवेत ऍसिडिक वायू उत्सर्जित केल्यामुळे बदलापूरकरांना झालेला मोठा त्रास लक्षात घेत या कंपनीला नियमांची पूर्तता करण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र ते न केल्याने उत्पादन बंद करण्याचे आदेश या कंपनीला देण्यात आल्याची माहिती सुद्धा पंकजा मुंडे यांनी दिलीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

GT vs MI: अखेर मुंबई इंडियन्सला विजय मिळाला; तिलक आणि अश्विनीनं गुजरातचा धुव्वा उडवला

IAS Transferred : २४ IAS अधिकाऱ्यांसह १० जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांच्या धडाधड बदल्या, युपीच्या प्रशासकीय वर्तुळात खळबळ

Salary: सरकारी कर्मचाऱ्यांना एकाच महिन्यात दोन वेळा पगार मिळणार, 'या' देशानं घेतला मोठा निर्णय

Rain Alert in Maharashtra : महाराष्ट्रात पुढील ५ दिवस वादळी पाऊस; या जिल्ह्यांना हवामान विभागाचा सतर्कतेचा इशारा

अमेरिका-इराण युद्ध पुन्हा पेटणार? अमेरिकेच्या कुरापतीमुळे इराणचा संताप

SCROLL FOR NEXT