Akshay Shinde Parents Searching for Burial Ground for His Funeral Saam Tv
महाराष्ट्र

Akshay Shinde : अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरला आठवडा झाला, पण स्मशानभूमीत दफनविधीसाठी कुणी जागाच देईना

Akshay Shinde Encounter: अक्षय शिंदे याच्याअंत्यविधीसाठी फक्त आजचाच दिवस उरला आहे. उल्हासनगरसहमध्ये अक्षय शिंदे याच्या दफनविधीला स्थानिकांनी नकार दिला.

Namdeo Kumbhar

Badlapur Encounter News : बदलापुरातील चिमुकल्या विद्यार्थिनींसोबत घडलेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणातील एन्काऊंटर झालेला आरोपी अक्षय शिंदे याच्या एन्काऊंटरला 7 दिवस उलटले. पण अद्याप त्याच्या अंत्यविधीसाठी जागा निश्चित झालेली नाही. राज्य सरकारने अक्षय शिंदेचा अंत्यविधी सोमवारपर्यंत करण्याची ग्वाही हायकोर्टात दिली आहे.

त्यामुळे अक्षय शिंदे याच्याअंत्यविधीसाठी फक्त आजचाच दिवस उरला आहे. उल्हासनगरसहमध्ये अक्षय शिंदे याच्या दफनविधीला स्थानिकांनी नकार दिला.

अक्षय शिंदे याचा मृतदेह दफन करण्यासाठी बदलापूर, उल्हासनगरसह विविध भागांमध्ये विरोध होत आहे. त्यामुळे नवा पेच निर्माण झालाय. गुरुवारी अक्षय शिंदे (Akshay Shinde) याचे पालक अंबरनाथमधील हिंदू स्मशानभूमी येथे दफन विधीची जागा पाहण्यासाठी गेले होते. पण अंबरनाथ पालिकेने दफनविधीच्या परवानगीसाठीची त्यांचा अर्ज स्वीकारला नाही.

अक्षय शिंदे याचा मृतदेह दफन करण्यासाठी त्याच्या आई-वडिलांनी कोर्टाचा दरवाजा ठोठावला. कोर्टाकडून मृतदेहासाठी जागा पाहण्यास सांगितले. पण तरीही स्थानिक आणि राजकीय पक्षाकाडून विरोध केला जात आहे.

शिंदेंच्या शिवसेनेचा विरोध -

उल्हासनगरमधील स्मशानभूमित अक्षय शिंदे याचा मृतदेह दफन करण्यासाठी प्रशासनाकडून तयारी करण्यात आली. प्रशासनाकडून खड्डाही खोदण्यात आला. पण याला एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडून विरोध दर्शवण्यात आला. शिंदेंच्या शिवसेना पदाधिकाऱ्यांनी अक्षय शिंदे साठी खणलेला खड्डा बुजवला.

उल्हासनगरमध्येही जागा मिळेना -

उल्हासनगरमध्येही अक्षय शिंदेचा मृतदेह दफन करण्यास विरोध झाला. बदलापूरमध्येही अक्षय शिंदे याचा मृतदेह दफन करण्यास विरोध कऱण्यात आला होता. उल्हासनगरमधील शांतीनगर स्मशानात शिवसेना शिंदे गटाचे महानगरप्रमुख राजेंद्र चौधरी यांनी विरोध केला. पोलिसांनी खड्डा करण्यास सांगितले असले तरी आमचा त्या नराधमाला आणि पोलिसांनाही आम्ही विरोध करू, अशी भूमिका त्यांनी घेतली. बदलापुरात तो राहायचा तर त्याचा मृतदेह बदलापुरात दफन केला जावा. उल्हासनगरच्या मातीत या नराधमाचा मृतदेह दफन करण्यास आमचा विरोध आहे, असे राजेंद्र चौधरी म्हणाले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kolhapur Politics: मधुरिमाराजेंच्या माघारीची INSIDE STORY; कोल्हापूर उत्तर मतदारसंघात काय घडलं?

Assembly Election: एकनाथ शिंदे आणि राज ठाकरेंमध्ये संघर्ष; शिंदेविरुद्ध दोन ठाकरे

Maharashtra Election: महायुतीनं केलंय काम भारी! लाडक्या बहिणींना मिळणार २१०० रुपये, कोल्हापुरात महायुतीची १० वचनं

Maharashtra News Live Updates: भाजपचा मनसेचे उमेदवार बाळा नांदगावकर यांना पाठिंबा

Uddhav Thackeray: पीएम मोदींच्या अशुभ हातांनी बांधलेला पुतळा पडला'; उद्धव ठाकरेंची टीका

SCROLL FOR NEXT