Badlapur Political News Saam tv
महाराष्ट्र

Badlapur Political News : बदलापुरात महायुतीत फूट; भाजप- राष्ट्रवादीचा एकनाथ शिंदेना धक्का

Badlapur news : नगरपरिषद निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार पक्षाने युती करत एकनाथ शिंदेना जोरदार धक्का दिला. या युतीमुळे शिंदे गट एकाकी पडल्याचं चित्र

Rajesh Sonwane

मयुरेश कडव 
बदलापूर
: आगामी नगरपालिका निवडणुकीपूर्वी बदलापुरात महायुतीमध्ये फूट पडल्याचे पाहण्यास मिळत आहे. भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार पक्षाने युतीची मोट बांधल्याने एकनाथ शिंदे यांच्या हा मोठा धक्का मानला जात आहे. तर शिवसेनेने देखील पालिका निवडणूक स्वबळावर लढण्याचे संकेत दिले आहेत. यामुळे बदलापूर नगरपालिकेची निवडणुक चुरशीची होण्याची शक्यता आतापासून निर्माण झाली आहे. 

राज्यात महायुतीचं सरकार असलं तरी बदलापुरात मात्र महायुतीत फूट पडली आहे. दरम्यान बदलापूर नगरपालिकेत २४ प्रभागातून ४९ सदस्य निवडून दिले जाणार आहेत. पाच वर्षांपूर्वी बदलापूर नगरपालिकेत शिवसेनेची एकहाती सत्ता होती. शिवसेनेच्या २५, भाजपच्या २० तर राष्ट्रवादीच्या २ जागा होत्या. यावेळी शिवसेनेसोबत युती न झाल्यास भाजप- राष्ट्रवादी (AP) आणि शिवसेना शिंदे गट अशी थेट लढत पाहायला मिळेल.

नगरपरिषद निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार पक्षाने युती करत एकनाथ शिंदेना जोरदार धक्का दिला. या युतीमुळे शिंदे गट एकाकी पडल्याचं चित्र आहे. तर कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेऊन ही युती केल्याची प्रतिक्रिया आमदार किसन कथोरे यांनी दिली आहे. तर राज्यात सत्तेत एकत्र असल्यामुळे बदलापुरातही शिवसेनेला सोबत घेण्यासाठी प्रयत्नशील आहोत, असं सांगत परशुराम आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष कॅप्टन आशिष दामले यांनी सावध भूमिका घेतली.

भाजप- राष्ट्रवादीच्या युतीने शिवसेनेत नाराजी  

बदलापुरात शिवसेना शहरप्रमुख वामन म्हात्रे आणि आमदार किसन कथोरे यांच्यातील वाद सर्वश्रुत आहे. त्यामुळे याठिकाणी शिवसेना-भाजप एकत्रित येण्यावर सुरुवातीपासूनच शंका उपस्थित केली जात होती..त्यात पहिल्या टप्प्यात भाजप आणि राष्ट्रवादीने युती करत बाजी मारली. मात्र भाजप आणि राष्ट्रवादीच्या युतीमुळे एकाकी पडलेल्या शिवसेनेत नाराजी पसरली आहे. परंतु आम्हाला विश्वासात न घेता ही युती करण्यात आली. तरी शिवसेना स्वबळावर निवडणूक लढवून सत्ता मिळवेल; असा विश्वास शिंदे गटाचे शहरप्रमुख वामन म्हात्रे यांनी व्यक्त केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chhatrapati Shivaji Maharaj: छत्रपती शिवाजी महाराज दाढी का ठेवायचे? जाणून घ्या कारणं

Maharashtra Live News Update: पुण्यात शिवजयंती निमित्त वाहतूक बदल, पर्यायी मार्ग वापरण्याचे पोलिसांचे आवाहन

Success Story: दोनदा UPSC क्रॅक; आधी IPS मग IAS; तिसऱ्यांदा लग्न करणारे IAS अवि प्रसाद आहे तरी कोण?

Gaming Jihad: दहशतवाद्यांचा 'गेमिंग' जिहाद; मुलांना कट्टरपंथी बनवण्याचा नवा डाव

T20 World Cup 2026: १२ वर्षांनंतर चमत्कार घडला! टी२० वर्ल्ड कपमध्ये पहिल्यांदा नेपाळनं जिंकला सामना, स्पर्धेचा शेवट गोड

SCROLL FOR NEXT