Badlapur News Saam tv
महाराष्ट्र

Badlapur News : बदलापूरात यंदा दहीहंडी उत्सव रद्द; मुलींवरील अत्याचार घटनेच्या पार्श्वभूमीवर निर्णय

Badlapur News : बदलापूरमध्ये दोन आठवड्यांपूर्वी दोन चिमुकल्या मुलीवर अत्याचार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. याचे पडसाद राज्यभरात उमटले आहे.

अजय दुधाणे

बदलापूर : दहीहंडी उत्सव सर्वत्र अगदी आनंदात व उत्साहात साजरा केला जात असतो. मात्र बदलापूर शहरात झालेल्या चिमुकल्या मुलींवरील अत्याचाराच्या घटनेनंतर यंदा शहरातील सर्व दहीहंड्याचा उत्सव रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सामाजिक जाणिवेच्या भावनेतून शहरातील दहीहंडी उत्सव रद्द करण्यात आल्याची माहिती उत्सव आयोजकांनी दिली आहे.

बदलापूरमध्ये (Badlapur) दोन आठवड्यांपूर्वी दोन चिमुकल्या मुलीवर अत्याचार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. याचे पडसाद राज्यभरात उमटले आहे. या घटनेमुळेच यंदा बदलापूरमध्ये कोठेही दहीहंडी फोडली जाणार नाही. बदलापूर शहरात काँग्रेस शहर अध्यक्ष संजय जाधव यांच्या माध्यमातून दरवर्षी ५ लाख ५५ हजार ५५५ रुपयांची सर्वात मोठी दहीहंडी उभारली जाते. अजय राजा हॉल समोर उभारली जाणारी ही (Dahi Handi Utsav) दहीहंडी यावर्षी रद्द करण्यात आली आहे. बदलापूर शहरात घडलेल्या दुर्दैवी घटनेनंतर सर्वप्रथम संजय जाधव यांनी दहीहंडी रद्द करण्याचा निर्णय जाहीर केला. यानंतर शहरातील सर्वच लहान मोठ्या दहीहंड्या रद्द करण्यात आल्या आहेत. 

कोणत्याही कार्यक्रमात वाजणार नाही डीजे 

आजचा दहीहंडी उत्सव रद्द करण्याचा निर्णय आयोजकांनी घेतला आहे. तर दुसरीकडे शहरातील साऊंड असोसिएशनने देखील यावर्षी कुठल्याही कार्यक्रमात डीजे न वाजवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे दहीहंडीच्या दिवशी बदलापूर शहरात शुकशुकाट पाहायला मिळत आहे. मात्र त्यातूनही बदलापूरकरांनी सामाजिक भान राखल्याचे पाहायला मिळत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Firing On Former CM: मोठी बातमी! जम्मूमध्ये माजी मुख्यमंत्र्यांवर गोळीबार

इराणनं पेरलं होर्मुझमध्ये जलसुरुंग; होर्मुझची सामुद्रधुनी की 'विध्वंसाचा सापळा'?

गॅसचं विघ्न, अडली लग्न; 10 हजार लग्न लांबणीवर पडणार? पाहा व्हिडिओ

Chandrapur Fake Currency Racket: ९१ लाखांच्या बनावट नोटा जप्त; बंगाली कॅम्प परिसरातील अपार्टमेंटमध्ये सुरू होता छापखाना

युद्धामुळे इंटरनेट धोक्यात येणार? होर्मुझमधील हल्ल्यांमुळे ब्लॅकआउटचा धोका, VIDEO

SCROLL FOR NEXT