monkey enters badlapur municipal corporation  saam tv
महाराष्ट्र

Badlapur news : बदलापूर नगरपालिकेत आला अनोळखी पाहुणा; कर्मचाऱ्यांची उडाली दाणादाण , नेमक काय घडलं?

Badlapur news : कुळगाव-बदलापूर नगरपालिकेच्या इमारतीत मंगळवारी दुपारी एका माकडाने अनपेक्षितपणे प्रवेश केल्याने प्रशासकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली. अचानक आलेल्या या पाहुण्यामुळे दैनंदिन कामात मग्न असलेल्या पालिका कर्मचाऱ्यांची चांगलीच भंबेरी उडाली.

Saam Tv

कुळगाव-बदलापूर नगरपालिकेची मुख्य प्रशासकीय इमारत बदलापूर पूर्वेकडील वर्दळीच्या स्टेशन परिसरात आहे. नेहमी गजबजलेल्या या परिसरातील पालिकेच्या तिसऱ्या मजल्यावर दुपारच्या सुमारास अचानक एक माकड दिसून आले. हे माकड समोर येणाऱ्या लोकांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रयत्न करत असल्याने परिसरात पळापळ आणि भीतीचे वातावरण पसरले.

तिसऱ्या मजल्यावर काही वेळ मुक्तसंचार केल्यानंतर हे माकड जिन्याने चौथ्या मजल्यावर गेले. आणि तिथून जवळच्या झाडांवर उड्या मारत ते बाहेर पळून गेले. माकड निघून गेल्यानंतर कर्मचारी आणि नागरिकांनी सुटकेचा श्वास घेतला.

शहरी भागात माकडांची वाढती दहशत

बदलापूरपासून 5 ते 7 किलोमीटर अंतरावर असलेल्या भोज आणि कोंडेश्वरच्या जंगल परिसरात माकडांचा वावर मोठ्या प्रमाणात आढळतो. मात्र, आता ही माकडे अन्नाच्या शोधात थेट शहरी भागात आणि वर्दळीच्या ठिकाणांवर येऊ लागल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे व दहशतीचे वातावरण पसरले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Wakad News : पिंपरी चिंचवडमध्ये मायलेकाची आत्महत्या, १८ व्या मजल्यावरून मारली उडी

CBSE चा 10 वीच्या परीक्षेसाठी मोठा निर्णय! गणितात नापास, तरी होणार पास! नेमकं कसं?

10 Gram Gold Mangalsutra: 10 ग्रॅम सोन्याचे मंगळसूत्र; रोज वापरण्यासाठी सुंदर आणि आकर्षक 5 डिझाइन्स

Devgad Hapus mango : हापूसच्या पहिल्याच पेटीनं केला मार्केट जाम! 36 हजार रुपये विक्रमी दर

Tablet Vs Capsule: टॅब्लेट आणि कॅप्सूलमध्ये नेमका फरक काय आहे? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT