Eknath Shinde 
महाराष्ट्र

Bachchu Kadu : बच्चू कडू राजकीय 'प्रहार' करणार, शिंदेंच्या शिवसेनेबाबत मोठा निर्णय घेणार

Bachchu Kadu latest news : प्रहार पक्ष शिंदेसेनेत विलीन होणार का, याबाबत आज बच्चू कडू मोठा निर्णय घेणार आहेत. विधान परिषद जागेच्या ऑफरच्या पार्श्वभूमीवर ते पत्रकार परिषदेत आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत.

Namdeo Kumbhar

माजी मंत्री बच्चू कडू यांचा प्रहार पक्ष शिंदेसेनेत विलीन होणार असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगलीय. शिंदेसेनेकडून बच्चू कडू यांना विधानपरिषदेची ऑफर देण्यात आल्याची माहिती आहे. मात्र कडू यांनी आपला पक्ष शिंदेसेनेत विलीन करावा, अशी अट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठेवली असल्याचं सूत्रांनी सांगितलंय. त्यामुळे प्रहार पक्ष शिंदेसेनेत विलीन होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागलंय. दरम्यान, बच्चू कडू आज दुपारी 12 वाजता मुंबईत पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत.

बच्चू कडू विधान परिषदेवर जाणार?

विधान परिषदेच्या आमदारकीसाठी प्रहार पक्ष शिवसेनेत विलीन करावा, अशी मोठी अट एकनाथ शिंदे यांनी बच्चू कडू यांच्यासमोर ठेवल्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर बच्चू कडू आज दुपारी १२ वाजता मुंबईत पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, काल रात्री बच्चू कडू आणि एकनाथ शिंदे यांच्यात एक महत्त्वाची बैठक पार पडली. "प्रहार पक्ष विलीन न करता विधान परिषदेची जागा द्यावी," अशी अंतिम भूमिका बच्चू कडू यांनी या बैठकीत मांडल्याचे समजते. आता बच्चू कडू नेमका काय निर्णय घेतात, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत FDA ची ‘एन्ट्री’

Hing Benefits : रोज चिमूटभर हिंग खाल्ल्याने काय होते? जाणून घ्या आरोग्यदायी 5 फायदे

Benefits Of Guava : बॅड कोलेस्ट्रॉल वाढलंय? रोज पेरू खाल्ल्याने कोलेस्ट्रॉल होईल कमी; जाणून घ्या फायदे

Manasi Parekh: नेपाळमधील पूरात अडकली, शेवटी...; प्रसिद्ध अभिनेत्रीने सांगितला थरारक अनुभ

Sambhajingar: डेटिंग ॲपवर तरुणांना जाळ्यात अडकवायचं, आलिशान बारमध्ये न्यायचं नंतर...; संभाजीनगरमध्ये 'लेडीज गँग'चा पर्दाफाश

SCROLL FOR NEXT