Amravati Bachchu Kadu  Saam Tv
महाराष्ट्र

Bachchu Kadu : अमरावतीत आज प्रहारचा मेळावा, बच्चू कडूंच्या भूमिकेकडं लक्ष; ठिकठिकाणी झळकले पोस्टर्स

ठिकठिकाणी 'मै झुकेगा नही' चे पोस्टर झळकले

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अमर घटारे

अमरावती - गुवाहटीला जाऊन बच्चू कडू यांनी ५० खोके घेतल्याचा आरोप रवी राणा यांनी केला होता. त्यानंतर बच्चू कडू (Bachchu Kadu) प्रचंड आक्रमक झाले. दोघांमधील वाद इतका विकोपाला गेला की आमदार रवी राणा (Ravi Rana)यांनी माझ्यावर केलेल्या आरोपांचे पुरावे सादर करावे, अन्यथा १ नोव्हेंबर रोजी मोठा खुलासा करणार असल्याची घोषणाही कडू यांनी केली.

अमरावतीत आज आमदार बच्चू कडू यांच्या उपस्थितीत प्रहार संघटनेचा मेळावा होणार आहे. आमदार रवी राणा यांच्यासोबत झालेल्या वादाबाबत बच्चू कडू आज काय भुमिका मांडणार याकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे. दरम्यान, ज्या ठिकाणी मेळावा होणार आहे, त्या ठिकाणी 'मै झुकेगा नही' चे पोस्टर झळकले आहेत. त्यामुळं राजकीय चर्चांना उधाण आलं आहे

आमदार रवी राणा यांनी बच्चू कडू यांच्यावर आरोप केले होते. त्यानंतर त्यांनी काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. त्यानंतर रवी रणा यांनी बच्चू कडूंची दिलगिरी व्यक्त करत शब्द मागे घेतो असे सांगितले. मात्र मी माझी भूमिका कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन व त्यांना संपूर्ण परिस्थिती सांगून घेईल. मी माझी भूमिका स्पष्ट करेल असे आमदार बच्चू कडू यांनी स्पष्टच सांगितले.

त्यानंतर आज अमरावतीच्या नेहरू मैदानावर बच्चू कडू हे विशाल शक्ती प्रदर्शन करणार आहे. त्यासाठी राज्यभरातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने अमरावतीत दाखल झाले आहे. दरम्यान या ठिकाणी बच्चू कडू यांच्या समर्थनार्थ मै झुकेंगा नही अशी आशयाचे बॅनर सर्वत्र लावण्यात आले आहे. त्यामुळे मेळाव्यापूर्वीच जोरदार अशी बॅनरबाजी प्रहार कार्यकर्त्यांनी केल्याने राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. त्यामुळे आजच्या या मेळाव्यात बच्चू कडू काय निर्णय घेतात याकडे अमरावतीसह संपूर्ण राज्याचे लक्ष लागला आहे.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: जालन्यात पेट्रोल-डिझेल दरवाढीचा भडका

Weight Loss Drinks: वजन कमी करायचं आहे? मग या ७ ड्रिंक्सपैकी एक ड्रिंक पिऊन करा झटपट वजन कमी

Musician Death: भारतीय संगीताचा अनमोल ठेवा हरपला; ज्येष्ठ तबला वादक काळाच्या पडद्याआड, संगीतविश्व शोकसागरात

नीटची फेरपरीक्षा कधी होणार? NTA कडून अधिकृत तारीख जाहीर

Kidney cancer: लहान मुलांमध्ये किडनीच्या कॅन्सरची ही ३ प्रमुख लक्षणं दिसतात; 99% पालक करतात दुर्लक्ष

SCROLL FOR NEXT